‘उद्या विराटसोबत असं घडलं तर…’, टीममधून बाहेर असलेल्या R Ashwin ला संताप अनावर!

R Ashwin on Mankading: टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर आश्विन (Ravi Ashwin) आणि जॉस बटलर (Jos Buttler) यांच्यातील मंकडिंगचा (Mankading) वाद सर्वांना माहित आहे. दोन्ही खेळाडू या विषयावरील भूमिका स्पष्टपणे मांडताना दिसतात. अशातच आता नुकत्याच झालेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तान (Afg vs Pak) मॅचमध्ये देखील हाच विषय पुन्हा उपस्थित झाल्याचं पहायला मिळाला. त्यावर आता आश्विनने भलीमोठी पोस्ट लिहिल आपलं मत मांडलं आहे.

मंकडिंगची चर्चेचा छोटासा निष्कर्ष असा आहे की, ज्या देशांना अद्याप याचा फटका बसला नाही किंवा अनेकदा प्रयत्नही केले नाहीत तेच देश याला पाठिंबा देत आहेत. वनडे वर्ल्ड कप फायनल, टी-ट्वेंटी वर्ल्ड कप गेम्स किंवा ऍशेसमध्ये हे घडताना तुम्ही पाहिलं नाही कारण त्या इव्हेंटमध्ये सहभागी असलेले खेळाडू त्याठिकाणी खुप कष्टाने पोहोचलेले असतात. ते फक्त जिंकणे किंवा हरणे यापेक्षा खेळाचाच आदर करतात. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान या देशांचे खेळाडू उघडपणे याला विरोध करत आहेत. धोनी, रोहित किंवा कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष संघानेही प्रयत्न केला नाही. डिसमिस करण्यात काहीच गैर नाही, पण जर तुम्ही त्याला ओव्हरस्टेप करताना दिसले तर एकदा योग्य चेतावणी दिली पाहिजे, असं मत हिमांशू पारिक यांनी मांडलं होतं. त्यांच्या या पोस्टवर आश्विने पोस्ट लिहित प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाला आर आश्विन?

मंकडिंग हे परिस्थितीचे योग्य आकलन आहे. कल्पना करा की कोणीतरी कोहली, रोहित, स्मिथ, रुट किंवा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत किंवा बाद फेरीतील महत्त्वाच्या नॉन-स्ट्रायकर फलंदाजांपैकी एकाला धावबाद केले की जे सामन्याचा निकाल ठरवू शकेल, असं आश्विन म्हणतो. मला खात्री आहे की मग पुन्हा एकदा हा मुद्दा समोर येईल आणि अजूनही तज्ज्ञ या मताशी सहमत नाहीत.  अर्थातच त्याचा फटका चाहत्यांना सहन करावा लागेल, असंही आश्विन म्हणतो.

Related News

सध्या सर्वच संघ मंकडिंग करत नसले तरी यंदाचं वर्ष वर्ल्ड करचं आहे. मला आशा आहे की प्रत्येकजण यासाठी तयार आहे आणि जो संघ म्हणेल की आम्ही असं करणार नाही, तो त्यांचा निर्णय आहे. माझा विश्वास आहे की संघांनी त्यांच्या मार्गात येणारा प्रत्येक फायदा मिळवला पाहिजे कारण विश्वचषक जिंकणं ही आयुष्यभराची उपलब्धी आहे, असं मत आर आश्विनने म्हटलं आहे.

पाहा पोस्ट – 

दरम्यान, फलंदाज कोणीही असो आणि परिस्थिती कशीही असो, गोलंदाज कधी चेंडू फेकतो आणि त्याचा खांदा कधी फिरतो, हे फलंदाजाने पाहावं. जर त्याने हे केलं नाही तर तो धावबाद होतो. मग आपण गोलंदाजाचे कौतुक केलं पाहिजे आणि फलंदाजांना पुढे काळजी घेण्यास सांगितलं पाहिजं, असंही आश्विन म्हणतो.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *