हल्लाबोल: हिंमत असेल तर बिल्किस बानो अन् मणिपूर पीडितेच्या हातून राखी बांधून घ्या! उद्धव ठाकरेंचे PM मोदींना आव्हान

मुंबई36 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी गुजरात दंगलीतील पीडित बिल्किस बानो व मणिपूरच्या पीडितेच्या हातून राखी बांधून घ्यावी, असे आव्हान शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले आहे. भाजपच्या भ्रमाचा भोपळा फुटल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.

Related News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताधारी NDA च्या खासदारांना मार्गदर्शन करताना त्यांना येत्या रक्षाबंधनाला मुस्लिम महिलांकडून राख्या बांधून घेण्याची सूचना केली होती. उद्धव ठाकरे यांनी या मुद्यावरून मोदींवर तुफान टीका केली. तसेच त्याना मणिपूरची नग्न धिंड काढण्यात आलेली सामूहिक बलात्कार पीडिता व गुजरात दंगलीतील पीडिता बिल्किस बानो यांच्याकडून राखी बांधून घेण्याचे आव्हान दिले आहे. ते मुंबईत आयोजित संभाजी ब्रिगेड व शिवसेनेच्या (ठाकरे) कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

बिल्कीस बानोंकडून राखी बांधा?

पंतप्रधानांनी सत्ताधारी खासदारांना मुस्लिम भगिनींकडून रक्षाबंधन करून घेण्याची सूचना केली आहे. पण मणिपूरमध्ये अत्याचार होणाऱ्या महिलांच्या संरक्षणाचे काय? हिंमत असेल तर त्यांनी गुजरातमध्ये अत्याचार झालेल्या बिल्कीस बानोकडून राखी बांधून घ्यावी. बिल्किसच्या गुन्हेगारांना गुजरात सरकारने नुकतेच मोकाट सोडले आहे, असे ते म्हणाले.

विकास तर ब्रिटीशही करत होते

देशातील भाजपच्या सरकारला आता 10 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे त्यांनी या 10 वर्षांत काय केले? हे सांगावे. त्यांनी किती योजना सुरू केल्या? त्या किती जनतेपर्यंत पोहचल्या? याची चर्चा करावी. त्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आहे. विकासच हवा असेल तर तो ब्रिटीशही करत होते. त्यांनी मुंबईतील अनेक वास्तू बांधल्या. त्यातील काँग्रेसच्या सत्तेची 70 वर्षे काढा. गत 10 वर्षांत तुम्ही काय केले ते सांगा. आम्हालाही विकास हवा आहे. पण सोबत स्वातंत्र्यही हवे आहे, असे ते म्हणाले.

देशविरोधी विचार संपवण्याची गरज

भगव्याला विरोध करणाऱ्या राजकीय औरंगजेब व अफजलखानाच्या छाताडावर आपल्याला भगवा फडकवयाचा आहे. आपल्याला कोणत्याही व्यक्तीला संपवायचे नाही. आपल्याला देशविरोधी विचार संपवायाचे आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या तेजाची प्रेरणा घेत आपल्याला स्वातंत्र्याची लढाई लढायची आहे. त्यात आपलाच विजय होईल यात शंका नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

सडका आंबा अन् शिंदे

आंब्याच्या पेटीत एक सडका आंबा निघाला तरी, तो संपूर्ण पेटी नासवतो. त्यामुळे आपण सडके आंबे लांब केले. मला मुख्यमंत्रीपदाची इच्छा नव्हती. आता आपल्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा आहे. ही आपल्या स्वाभिमान व स्वातंत्र्याची लढाई आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपवर तोंडसूख घेताना म्हणाले. एक गुरुजी महाराष्ट्राच्या महापुरुषांचा अवमान करत आहे. हा त्याचाही गुरुजी आहे. ते त्यांच्यावर कारवाई का करत नाहीत?, असा सवालही ठाकरे यांनी यावेळी सरकारला केला.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *