प्रेमविवाह करायचाय, मग आई- वडिलांची परवानगी आवश्यक: गोंदियातील नानव्हा ग्रामपंचायतीचा ठराव, राइट टू लव्ह संघटनेचा आक्षेप

प्रतिनिधी |गोंदियाएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

सालेकसा तालुक्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने प्रेमविवाह करणाऱ्या जोडप्यांना आई- वडिलांची परवानगी असेल तरच विवाह नोंदणी करणार, असा ठराव घेतला. याला राईट टू लव्ह संघटनेने आक्षेप घेत नानव्हा गावचे सरपंच, सर्व पदाधिकारी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांना नोटीस पाठवली आहे.

Related News

गोंदिया जिल्ह्यातील नानव्हा ग्रामपंचायतीने आईवडिलांची प्रेम विवाहाला संमती नसेल तर त्या विवाहाची नोंद करण्यास नकार दिला आहे. असा असंविधानिक ठराव करण्याचा ग्रामपंचायतीला कोणताच अधिकार नाही. आपले संविधान जोडीदार निवडण्याचा अधिकार देते. मग तो जोडीदार कोणत्याही जाती-धर्मातील असला तरी हरकत नाही. आणि त्यातही विशेष म्हणजे आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन म्हणून योजना आहेत. “राईट टू लव्ह” या संघटनेमार्फत नानव्हा ग्रामपंचायतीस कायदेशीर नोटीस पाठवली असून हा ठराव नोटीस मिळाल्यापासून ७ दिवसांच्या आत रद्द करण्यास सांगितले. राईट टू लव्ह संघटना पुणे येथील रोशन मोरे यांनी ही नोटीस बजावली असल्याचे नानव्हाचे सरपंच गौरीशंकर बिसेन यांनी सांगितले.

राज्य शासनाचे मार्गदर्शन मागवले

प्रेमविवाहाला घरच्यांची परवानगी असा ठराव ग्रामसभेत बहुमताने घेतला आहे. यावर शासनाचे मार्गदर्शन मागितले आहे. त्यानुसार पुढील निर्णय घेणार आहे. राइट टू लव्ह संघटनेचा कॉल सरपंचांना आला. पण अद्याप कागदोपत्री अशी कोणतीही नोटीस नानव्हा ग्रामपंचायत कार्यालयाला प्राप्त झालेली नाही. -शिवाजी राठोड , ग्रामसेवक, ग्रामपंचायत नानव्हा.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *