बीडमध्ये भुजबळांची शरद पवारांवर टीका, कार्यकर्त्यांच्या गोंधळामुळे भाषण आटोपतं घ्यावं लागलं

बीड : बीडमध्ये अजित पवार गटाच्या सभेत मोठा गोंधळ झाला. राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) बोलत असताना कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला आणि छगन भुजबळ यांना भाषण आटोपतं घ्यावं लागलं. छगन भुजबळ हे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका करत होते, त्यामुळे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अखेरीस पुढील काही मिनिटातच भुजबळांनी भाषण उरकलं. 

भुजबळांची पवारांवर सडकून टीका

बीडमधील सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली. अनेक दिवसांची खदखद त्यांनी सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरच बोलून दाखवली. यावेळी आपल्याला राजीनामा अचानक द्यायला शरद पवारांनी कशाप्रकारे सांगितले, ईडी कारवाई होती त्यावेळी स्वतःला आणि समीर भुजबळ यांना जेलमध्ये जावं लागलं परंतु आम्ही पक्ष सोडला नाही, अशी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर देणारी उत्तर देखील दिली. परंतु भाषण संपताना कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गोंधळ घालायला सुरुवात केली आणि यामुळे बोलणं शक्य न झाल्याने छगन भुजबळ यांना भाषण उरकतं घ्यावं लागलं.

Related News

बीडमध्ये पावसामुळे अजित पवार गटाची सभा उशिरा सुरु झाली. त्यात सर्व नेत्यांच्या भाषणामुळे सभा आणखीच लांबली. अजित पवार सर्वात शेवटी बोलेले. त्याआधी छगन भुजबळ भाषणासाठी आले होते. भुजबळ शरद पवार यांच्यावर टीका करत होते. यावेळी खाली कार्यकर्त्यांनी चांगलाच गोंधळ घातला. अखेर माघार घेत भुजबळांनी भाषण संपवलं.

जितेंद्र आव्हाड यांच्याकडून बीडकरांचे आभार

दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भुजबळांवर टीका करत बीडकरांचे आभार मानले. ज्यांचं खाल्लं, प्यायलं… त्यांच्याच नावाने ओकाऱ्या काढत आहेत, अशी टीका त्यांनी भुजबळांवर केली. शरद पवार यांच्याविरोधात ऐकून न घेण्याची बीडकरांची भूमिका होती, त्यासाठी त्यांना सलाम आणि मानाचा मुजरा, अशा शब्दात त्यांनी बीडकरांना धन्यवाद दिले.

पुण्यात भुजबळांविरोधात शरद पवार गटाकडून आंदोलन

दरम्यान पुण्यात शरद पवार गटाकडून कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. बीडमधील सभेत भुजबळांनी शरद पवार यांच्या सडकून टीका केल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्याविरोधात वक्तव्य करणाऱ्या भुजबळ यांच्यांविरोधात आज पुण्यात शरद पवार गटाचे कार्यकर्ते एकवटून जाहीर निषेध आंदोलन करणार आहेत.

हेही वाचा

Chhagan Bhujbal: साहेब उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादांना मान्यता द्या, भांडण मिटवून टाका; भुजबळांचं शरद पवारांना आवाहन



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *