file photo
बेळगाव; महातंत्र वृत्तसेवा : शहरातील धर्मनाथ सर्कल येथे तरुणाचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना घडली. बुधवारी (दि. ३०) रात्री साडेदहाच्या सुमारास सुमारास ही आली. नागराज इराप्पा गाडीवड्डर (वय 30 रा. रामनगर वड्डरवाडी) असे मृताचे नाव आहे.
शहरातील धर्मनाथ भवन सर्कल मधील स्पंदन हॉस्पिटलच्या समोर रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह पडल्याचे दिसून आले. बघ्यांनी ही माहिती माळमारुती पोलिसांना दिली. पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांनी तातडीने सहकाऱ्यांसह येथे भेट देऊन पाहणी केली. आधी मृताची ओळख पटत नव्हती. परंतु दहा मिनिटे तपास केल्यानंतर सदर मृतदेह येथून जवळच असलेल्या वड्डरवाडीतील नागराज याचा असल्याचे स्पष्ट झाले. नागराज याला दारूचे व्यसन होते. बहुदा तो नशेत समोर बघून जात असताना त्याच्या पाठीमागून आलेल्या काहींनी डोकी दगड घालून खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला असून मारेकऱ्यांचा शोध सुरू आहे.निरीक्षक कालीमिर्ची तपास करीत आहेत.