जालना; महातंत्र वृत्तसेवा : आज (दि. 31) आष्टी ग्रामपंचायत येथे सकाळी 10 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होतेया वेळी उपस्थित नागरिकांनी गंभीर झालेल्या पाणी प्रश्नावरून सरपंच ग्रामविकास अधिकारी सह सदस्यांना धारेवर धरले.
आम्हाला पाणी द्यास, आमच्याकडे लक्ष कधी देणार आम्हाला पाणी मिळणार आहे की नाही आम्हाला पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ ग्रामपंचायत च्या दुर्लक्षा मुळे झाल्याचा आरोप या वेळी नाकरिकांनी केला बाकी योजना आदी ची आम्हाला माहिती नको आधी पाणी द्या म्हणून काही काळ गोंधळ उडाला जो तो केवळ पाणी आणि फक्त पाणी प्रश्न घेऊन ग्रामपंचायत मध्ये आला असल्याचे आजच्या लोकांच्या गर्दी वरून दिसून आले पाणी प्रश्न मांडताना नागरिका मध्ये ग्रामपंचायत बद्दक तीव्र असंतोष दिसून येत होता.पाणी पुरवठ्यावर दर वर्षी लाखो रुपये खर्च दखवला जातो मात्र आज नागरिकांना पावसाळ्यातचं पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते.
या विषयी अधिक माहिती अशी की, ऑगस्ट महिन्याची ग्रामसभा आज (दि. 31) सकाळी 10 वाजता ग्रामपंचायतच्या प्रांगणात आयोजित करण्यात आली होती. या वेळी कोरम पूर्ण होण्याची प्रतीक्षा ग्रामविकास अधिकारी पहात होते लोक गर्दी करीत उपस्थिती पटावर साह्य करीत होते. यावेळी अनेक महिला देखील या ग्रामसभेला उपस्थित होत्या. नेहमी प्रमाणे ग्रामविकास अधिकारी डी. बी काळे यांनी ग्रामसभेत आलेल्या लोकांचे स्वागत करीत शासनाकडून आलेल्या विविध योजना नागरिकांना सांगण्यास सुरुवात केली. यावेळी नागरिकांनी पाणी प्रश्न उचलून धरल्याने गोंधळ निर्माण झाला.