लातूर : देवणी शहरात भर दुपारी लॉज मालकाचा खून | महातंत्र
देवणी; महातंत्र वृत्तसेवा : उदगीर निलंगा राज्य मार्गालगत असलेल्या शिवपार्वती लॉज मालकाचा डोक्यात लोखंडी वस्तूने मारून खून केल्याची घटना आज (दि. २७) बुधवारी दुपारी तीन वाजता उघडकीस आली. अशोक मन्मथप्पा लुल्ले (वय ६४) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. लाॅजमध्ये घडलेल्या या घटनेने देवणी शहरात एकच खळबळ उडाली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, देवणी येथील निलंगा उदगीर रोडवर असलेल्या शिवपार्वती लॉजचे मालक अशोक लुल्ले यांचा त्यांच्याच मालकीच्या असलेल्या लॉजच्या एका खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास आढळून आला. सकाळ पासून त्यांचे कुटुंबीय शोधाशोध करत होते व त्यांच्या फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नसल्याने ते सतत आपल्या लॉजवर असतात म्हणून कुटुंबीयांनी त्यांच्या लॉजवर येऊन पाहिलं असता लोखंडी चैन गेट आतुन लॉक असल्याचे आढळून आले व याच वेळी हलका पाऊस पडल्याने लॉजच्या दुसऱ्या मजल्यावरून रक्ताचे थेंब पाण्यासोबत वाहुन आल्याचे दिसले तेव्हा त्यांना काही अघटीत घडल्याचे लक्षात आले त्यांच्या कुटुंबीयांनी देवणी पोलिसांशी संपर्क केल्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सदर घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन कटेकर यांनी भेट दिली आहे. पोलिस निरिक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच देवणी शहरातील व्यापाऱ्यांनी आपले सर्व दुकाने व व्यवसाय बंद ठेवले.घटना स्थळी नागरिकांनी गर्दी केली. लोकांचा जमाव मोठ्या प्रमाणात शिवपार्वती लॉज समोर जमा झाला होता .जमाव पाहता पोलीस प्रशासनाने अतिरिक्त पोलीस तैनात केले आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *