मराठवाड्यात 23,731 कुणबी नाेंदी: बीडमध्ये सर्वाधिक 11,127, लातुरात केवळ 683 नाेंदी

अमोल मुळे | बीड25 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक
  • बीड वगळता मराठवाड्यातील ७ जिल्ह्यांत १२ हजार ६०४ नाेंदी

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मनोज जरांगे यांच्या मागणीनंतर सुरू झालेल्या कुणबी पुराव्यांच्या शोधात मराठवाड्यात बीड जिल्ह्यात सर्वाधिक कुणबी नोंदी सापडल्या आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ११ हजार १२७ नोंदी आढळल्या आहेत. मराठवाड्यातील इतर सात जिल्ह्यांमध्ये मिळून १२ हजार ६०४ नोंदी आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १७ दिवस उपोषण करताना जरांगे यांनी मराठा समाज हा कुणबी आहे. त्यामुळे मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी मागणी केली होती. शासनाने कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठीची कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्या. संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार केली होती. या समितीने सूचना केल्यानुसार महसूल नोंदी, जन्म-मृत्यू नोंदी, शाळेतील नोंदी, खासरा पत्र, जनगणना रजिस्टर यामधून १९१३ ते १९६७ पर्यंतच्या कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम प्रशासनाने हाती घेतली आहे. यासाठी जिल्हास्तरावर निवासी उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, कारागृह अधीक्षक, समाज कल्याणचे सहायक आयुक्त, पोलिस उपअधीक्षक, भूमी अभिलेख अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांची समिती तयार केली आहे.

Related News

या समितीच्या शोधमोहिमेत या नोंदीमध्ये ज्या कुटुंबाचे कुणबी

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *