नाशिकमध्ये मुळशी पॅटर्न: मारहाण करुन इंस्टाग्राम स्टेटस ठेवला; पाच संशयितांना पोलिस कोठडी

नाशिक22 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

संदीप आठवले आणि ओम पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. संदीप आठवले या तरुणाचे वय 22 आहे. दोघात शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, दोघात हाणामारी झाली. त्यावेळी संदीप आठवले यांच्या काही साथीदारांनी ओम पवार या तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर दोन तरुणांच्या गॅगवारमध्ये भांडणाला सुरुवात झाली. हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील असून यामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संदीप आठवले या तरुणावरती धारदार शस्त्राने 25 वार केल्याने त्याचा जागीचे मृत्यू झाला.

सिडकोतील शिवाजी चौक व्यापारी संकुलाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर गुरुवारी भाजी विक्रेता संदीप आठवले (28) हत्या प्रकरणी पाच संशयितांना न्यायालयाने 28 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तिघा अल्पवयीनांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

गुरुवारी दुपारी संदीप आठवले (22) हा त्याच्या भावासह शिवाजी चौकातील व्यापारी संकुलात असताना त्या ठिकाणी 8 जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने संदीपवर वार केले होते. गंभीर दुखापतींमुळे संदीपचा मृत्यू झाला होता.

व्हिडिओ केला पोस्ट

संदीप आठवले असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने मारेकरी असलेल्या ओम पवार उर्फ ओम्या खटकी या युवकाला नवीन नाशिक परिसरातील पाथर्डी फाटा परिसरात आपल्या काही साथीदारांच्या मदतीने बेदम मारहाण केली होती आणि त्याचा व्हिडिओ काढून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. या सगळ्या प्रकरणाचा राग ओम पवार उर्फ ओम्या खटकी या युवकाच्या डोक्यात होता आपली सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी झाली हा राग मनात धरून टप्प्यात येतात संदीपचा बदला घ्यायचा असे त्याने ठरवले.

काही क्षणात 27 वार

गुरुवारी जुने सिडको परिसरातील शिवाजी चौक भाजी मंडई समोर जेव्हा संदीप आठवले हा त्याच्या भावासोबत पाणीपुरी खाण्यासाठी आला त्यावेळी दबा धरून बसलेल्या ओम आणि त्याच्या साथीदारांनी क्षणाचाही विलंब न करता संदीप वर हल्ला चढवला हा हल्ला इतका जबर होता की अवघ्या 12 सेकंदात या चार हल्लेखोरांनी संदीप वर 27 वार केले. काही समजायच्या आतच ही सगळी घटना घडल्याने जुने सिडको शिवाजी चौक भाजी मंडई परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *