‘राजकारणात कुणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो’; अजित पवारांचे बीडच्या सभेत वक्तव्य

बीड : अजित पवार (Ajit Pawar) आमचे नेते असल्याचे वक्तव्य दोन दिवसांपूर्वी शरद पवार (Sharad Pawar) यांनी केले होते. त्यामुळे राज्याच्या राजकरणात यावरून जोरदार चर्चा पाहायला मिळाली. दरम्यान आता बीड जिल्ह्यात झालेल्या सभेत अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चर्चेला उधाण आले आहे. ‘राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. 

दरम्यान यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले की, राजकीय जीवनात चढउतार येतात, त्याना सामोरे जायचं असतं. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो. बीडच्या सभेच्या निमित्ताने सांगायचं आहे की, आम्ही जरी युतीच्या सरकारमध्ये असलो तरी सर्व जाती धर्मात जातीय सलोखा राखला गेला पाहिजे. जनतेला हे सरकार आपलं आहे हे आम्ही कृतीतून दाखवून देऊ म्हणाले. त्यामुळे अलीकडच्या काही सभेत अजित पवार जातीय सलोख्या बाबत हे सातत्यानं बोलताना पाहिला मिळत आहेत. 

Related News

पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, विरोधक सातत्याने दिशाभूल करत आहेत. कांदा प्रश्न झाला त्यावेळी आम्ही धनंजय मुंडे यांना दिल्लीत जाऊन पियुष गोयल यांची भेट घेण्याचे सांगितले. मी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने पियूष गोयल यांच्यशी बोलतं होतो. त्यानंतर 2410 किलो प्रती क्विंटल भाव काढला. 2 लाख क्विंटल कांदा आम्ही खरेदी करण्याचा निर्णय घेतला, असल्याचं अजित पवार म्हणाले. तर, शेतकऱ्याचा शिवारात पाणी आल्याशिवाय शांत बसणार नाही. पश्चिमेकडील पाणी पूर्वेकडे वळवल्याशिवाय मराठवाड्याचा पाणी प्रश्न सुटणार नाही. 1 लाख कोटी रुपये लागले तरी चालतील मराठवाड्याला पाणी द्यायचा निर्णय घेतला आहे. जनतेचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत असणं गरजचे आहे. म्हणुन आम्ही हा निर्णय घेतला असल्याचं पवार म्हणाले. 

धनंजय मुंडेंवर कायम संघर्ष करण्याची वेळ आली

काहीजणांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. परंतू, मी त्यावर बोलणार नाही. मी काम करणारा माणूस आहे. कामाला पहाटे सुरुवात करतो, काम करण अपली पँशन आहे. 2012 पासुन धनंजय माझ्यासोबत काम करत आहे. कायम त्यांच्यावर संघर्ष करण्याची वेळ आली. 2014 पासुन आदर्श विरोधी पक्षनेता म्हणुन काम करतो. महाविकास आघाडीत मंत्री असतांना त्याने वाड्यावस्त्यांची जातीवादी नावं बदलण्याचा धाडसी निर्णय घेतला, असल्याचे अजित पवार म्हणाले आहेत. 

विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारमध्ये गेलो 

आम्ही निवडणूकी पुरती आश्वासन देणार नाही. निवडणुका येतील जातील. मागचा अनुभव पाहाता आम्ही कायम कामावर लक्ष दिलं आहे. केंद्र आणि राज्य एका विचाराचे आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या चांगल्या ओळखी झाल्या आहेत. याचा फायदा करायचा आहे. चांगली कामं करायची आहेत. आम्ही विकास करण्यासाठी महायुतीच्या सरकारमध्ये गेलो आहोत. आमचा कुठला स्वार्थ नाहीं. कारण नसताना वेगळ्या चर्चा करतात यामध्ये तथ्य नाही, असेही अजित पवार म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *