सिंधुदुर्ग : मालवण तळाशील येथील भर समुद्रात अज्ञात मच्छिमारांचा राडा | महातंत्र
मालवण; महातंत्र वृत्तसेवा : मालवण तळाशील येथे सर्जेकोट येथे एका मत्सउद्योजकाच्या नौकेत घुसून अज्ञात मच्छिमारांनी खलाशांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

मालवण सर्जेकोट येथील कृष्णनाथ तांडेल यांची चिन्मय प्रसाद ही नौका आज सायंकाळी तळाशील समुद्रात 15 ते 20 वाव समुद्रात मच्छिमारी करत होती. यावेळी सुमारे 18 ते 20 पात छोट्या होड्याच्या साहायाने 30 ते 40 अज्ञात मच्छिमारांनी तांडेल यांच्या बोटीला घेरले. यातील काहीजण त्यांच्या नौकेत घुसून ताबा घेतला सुमारे 18 ते 20 मच्छिमारांनी बोटीवरील नेपाळी खलाशांना मारहाण करण्यास सुरुवात केली तर काही मच्छिमारांनी आपल्या हातात चाकू व रॉड काढून खलाशावर हल्ला केला. खलाशांनी आरडाओरडा सुरू केला असता मच्छिमारांनी पळ काढला. यावेळी हल्ला झाल्याची माहिती मिळताच बोटीचे मालक कृष्णनाथ तांडेल व गोपी तांडेल यांनी घटनास्थळी जाऊन नेपाळी खलाशांना मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक नितीन नरळे यांनी जखमी झालेल्या खलाश्याकडून माहिती घेतली.गेली अनेक वर्षे मालवण समुद्रात पारंपरिक मच्छिमार व पर्ससीननेट मच्छिमार यांच्यात संघर्ष सुरू आहे या वादाच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याची चर्चा सुरू आहे. शासन आणि मत्स्यविभागाच्या बेपर्वाईमुळे ही घटना.

मालवण तळाशील येथे सर्जेकोट येथील काही पर्ससिननेट नौकेवरील समुद्रात अडवून खलाशांना धमकविण्याची घटना घडली होती.आज हा भ्याड प्रकारचा हल्ला तळाशील येथील पारंपरिक मच्छिमारांनी केला.आम्ही या मच्छिमारांना पाहिले आहे त्या संशयितांची नावे पोलिसांना देऊ असे कृष्णनाथ तांडेल यांनी सांगितले. तर या घटनेला शासनाचा मत्स्यव्यवसाय विभाग जबाबदार आहे.असा आरोप मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी केला आहे.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *