मोहोळ; महातंत्र वृत्तसेवा : मोहोळ तालुक्यातील मसले चौधरी येथे मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ निषेध व्यक्त करीत सकल मराठा समाजाच्या वतीने मोहोळ वरून मसले चौधरी मुक्कामी आलेली एसटी बस (क्र. एम एच 14 बीटी 3427) च्या सर्व टायरची हवा सोडून काचा फोडण्यात आल्याची घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. शांततेच्या मार्गाने सुरू असलेले आंदोलन उपोषण सकल मराठा समाजाच्या शांततेचा अंत होत असल्याने हिंसक आंदोलनाचे हत्यार साखर मराठा समाजाच्या वतीने उपसण्यात येत आहे. याचीच धग आता ग्रामीण भागातील गावगाड्यापर्यंत पोहोचले आहे.
राज्यातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे यासाठी अंतरवाली सराटी येथे आंदोलन करते मनोज जरांगे पाटील यांचे मागील सहा दिवसापासून आमरण उपोषण सुरू आहे. या आमरण उपोषणाच्या पाठिंब्यासाठी राज्यभर विविध पद्धतीने आंदोलने, उपोषणे, मोर्चे काढण्यात येत आहेत. राज्य सरकारला मागील ४०दिवसांपूर्वी उपोषण केल्यानंतर ते उपोषण सोडताना तीस दिवसाची मदत मागितलेली असताना देखील मनोज जरांगे पाटील यांनी ४० दिवस मुदत दिली मात्र राज्य सरकारने याचा गांभीर्याने विचार न करता वेळ काढू पणा केला. चाळीस दिवस उलटून हे राजा सरकार याबाबत काहीच विचार करत नसल्याने पुन्हा जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण प्रकृतीखालीवलेली असताना देखील औषधोपचार न घेता सुरू ठेवले आहे. या आमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून व नाकर्त्या राज्य सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी विविध संस्थांचे पदाधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत.