सकाळी लॉजवर गेले अन् संध्याकाळी…; पुण्यात प्रेमीयुगुलांसोबत घडलं भयानक

सागर आव्हाड, झी मीडिया

Pune Crime News: अहमदनगरचा तरुण आणि पुण्याची तरुणी दोघांचेही मृतदेह पुण्यातील वाघोली येथील एका लॉजवर आढळले आहेत. या प्रेमीयुगलांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. कोमल सुनील बर्के (वय-२०, वर्षे रा.चंदननगर,खराडी,पुणे) आणि सचिन गोकुळ शिंदे (वय-२१ वर्षे, सध्या रा खराडी.नेहरु कॉलनी,भिंगार,अहमदनगर) असं आत्महत्या केलेल्या प्रेमी युगलाचे नाव आहे. (Pune Couple Suicide)

प्रेमी युगलांच्या आत्महत्येचे कारण मात्र अस्पष्ट असून प्रेमप्रकरणातून आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज लोणीकंद पोलीसांनी वर्तविला आहे. कोमल ही डीएम एलटीचे शिक्षण घेत होती. तर सचिन हा खाजगी नोकरी करत होता. अधिक तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरू करत आहेत. 

Related News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ते लॉजमध्ये आले होते. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास ते खोली सोडून जाणार होते. मात्र, सहा वाजल्यानंतरही ते खाली आली नाहीत. त्यामुळं लॉजच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी फोनवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अनेकदा फोन करुनही काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळं कर्मचारी त्यांच्या खोलीकडे गेले. 

दोघांनीही जी खोली राहण्यासाठी घेतली होती त्याचा जरवाजा उघडाच होता. लॉजचे कर्मचारी आत जाताच प्रेमीयुगल गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आले. त्यानंतर लॉजच्या मालकांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोघांचाही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 

दोघांनीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. प्रेमप्रकरणातून दोघांनी आत्महत्या केल्याचे आतापर्यंतच्या प्राथमिक तपासातून समोर आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांच्या मार्गदर्शनाखालील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरज राजगुरू करत आहेत.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *