पुणे7 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
ऑनलाईन वेबसाईटद्वारे खोली भाड्याने उपलब्ध करून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका महिलेला १ लाख २६ हजारांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी, खराडी येथील ३२ वर्षीय महिलेने चंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्याच्या विरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादींना रुम भाड्याने हवी होती. त्यासाठी त्यांनी ऑनलाईन खोली भाड्याने उपलब्ध करून देणार्या संकेतस्थळावर शोध घेतला. त्याद्वारे सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क करून रुम भाड्याने उपलब्ध करून देतो असे सांगून विविध चार्जेसच्या नावाखाली त्यांच्याकडून वेळोवेळी १ लाख २६ हजार २१० रुपये भरून घेतले. मात्र त्यानंतर देखील त्यांना रुम भाड्याने देण्यात आली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.
दुचाकीच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
भाजी आणण्यासाठी पायी जात असतांना भरधाव दुचाकीने धडक दिल्याने एका ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना पेरणे फाटा येथे घडली. धुडकू ताराचंद पाटील (वय-४०, रा. पेरणे फाटा, हवेली) असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रोशन पाटील (वय-३४, रा. पेरणे फाटा, हवेली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दुचाकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, धुडकू ताराचंद पाटील हे भाजी आणण्यासाठी पायी चालत जात होते. भरधाव आलेल्या दुचाकीचालकाने त्यांना धडक देऊन जखमी केले. यात त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक दीपक जाधव करत आहेत