राज्यातील ‘या’ 26 गावात अद्याप वीजच नाही; विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात

प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार: भारताला स्वातंत्र मिळवून 76 वर्ष उलटली आहेत. या कालावधीत देशाने खूप प्रगती केली. देश चंद्रावर पोहोचला आहे. जगभरात भारताचे कौतुक होत आहे. देशाच्या प्रगतीत महाराष्ट्र राज्याचाही मोलाचा वाटा आहे. असे असताना येथे काही गावे अजुनही दुर्देवी आयुष्य जगत आहेत. या गावाची कहाणी आपण जाणून घेणार आहोत. 

भारताच्या स्वातंत्र्याच्या 76 वर्षानंतरही नंदुरबार जिल्ह्यातील नर्मदा काठावरील 26 गावांमध्ये अद्यापही वीज पोहोचलेली नाही. याठिकाणी सौर ऊर्जेची योजना दिलेली आहे. तीही फक्त नावालाच असल्याचं गावकरी सांगतात. या गावांना वीज नसल्याने या परिसरातील नागरिकांना दळणवळणांच्या मोठ्या समस्या उद्भवत आहेत. धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील 26 गावातील कुटुंबांना वीज मिळाली नाही. 

वीजच नसल्याने गावातील लोकांच्या मूलभूत सुविधांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रश्नांकडे कोण लक्ष देणार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. वीज नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात चालले आहे. वीज नसल्याने इथल्या गृहीणी पारंपारिक पद्धतीने भाकरी बनवतात. तसेच महिला जात्यावर महिला दळण दळताना दिसून येतात. 

Related News

कुटुंबासोबत त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी निघाला पण चालत्या एसटीमध्येच…पुण्यात मन हेलावणारी घटना

पहिली ते चौथीमध्ये 123 विद्यार्थी आहेत. वीज नसल्याने मुले रात्रीचा अभ्यास करत नाहीत. येथे निवासी विद्यार्थी राहतात. वीज असती तर मुलांना अभ्यास करायला सांगितला असता, काहितरी वेगळा उपक्रम घेतला असता, अशी प्रतिक्रिया शिक्षकांनी दिली. दळणाचा मोठा प्रश्न इथे आहे. 25 किलोमीटर दळण घेऊन जावे लागते. 200 रुपये क्विंटलप्रमाणे घेतात. तर गाडीवाल्यांनाही वेगळे पैसे द्यावे लागतात. वीज असती तर गावात कोणीतरी चक्की घेतली असती. 123 निवाजी मुलांसाठी महिन्याला 15 क्विंटल दळण लागतं. त्यामुळे गावात वीज असायला हवी अशी विनंती त्यांनी केली आहे. 

सर्वसामान्य कुटुंबातून आलेला जसकरण ‘KBC 15’चा पहिला करोडपती, मुलभूत सुविधांसाठी त्याला..

वीज नसल्याने पाण्याचे कनेक्शन नाही. दळण द्यावे लागत, दीड किलोमीटरहून पाणी भरावे लागते म्हणून कोणी गावात मुलगी देत नाही, अशी प्रतिक्रिया गावच्या सरपंचांनी दिली.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *