मुंबई40 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
देशातील पुढारलेल्या राज्याचे बिरुद मिरवणाऱ्या महाराष्ट्रात महिलांवरील बलात्कार, विनयभंग, अपहरण व कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत मोठी वाढ झाल्याची बाब पोलिसांच्या एका आकडेवारीतून निष्पन्न झाली आहे. यात विनयभंग व अश्लील वर्तनाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवण्यात आलेत. त्यानंतर पुणे व नागपूरचा क्रमांक आहे.
Related News
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ; पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात 5863 घरांची बंपर लॉटरी
कोणत्या नैतिकतेने राष्ट्रकुल संसदीय परिषदेला राहुल नार्वेकर उपस्थित राहणार? आदित्य ठाकरेंची टीक
अजित पवार IN पडळकर OUT: देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यात अजितदादा एका गेटने आत, पडळकर दुसऱ्या गेटने बाहेर
दोन महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, राज ठाकरे म्हणाले…
World Cup Trophy in Pune : पुणेकरांनो संधी सोडू नका…! ‘या’ वेळेत निघणार वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक
पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा
नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू…लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन
नागपुरात रस्त्यांना नदीचे रुप: पुरात शेकडो नागरिक अडकले, बचावकार्यासाठी लष्काराला पाचारण; पाहा PHOTOS, VIDEOS
शरद पवार गटातील 11 पैकी 10 आमदारांविरोधात विधिमंडळात याचिका; या आमदाराचे नाव वगळले, पाहा यादी
Pune Crime news : पुण्यात दोन महिलांची तुंबळ हाणामारी, वडापाव तळण्याची कढई डोक्यात घातली अन्…
5000 पोलिस कर्मचारी, 1800 कॅमेऱ्यांचा वॉच; पुण्यात इतका तगडा बंदोबस्त का?
सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले विधानसभा अध्यक्षांना आत…
यासंबंधीच्या वृत्तानुसार, मुंबईत अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत महिलांच्या विनयभंगाच्या गुन्ह्यांत चौपट वाढ झाली आहे. यंदाच्या पहिल्या 8 महिन्यांत मुंबईत महिलांच्या विनयभंग व अश्लील वर्तनाच्या 1254 घटना नोंदवण्यात आल्या. राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत हे प्रमाण 4 पटीने जास्त आहे.
मुंबईत बलात्काराच्या 549 घटना
याच कालावधीत बलात्काराच्या 549 गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांकडून करण्यात आली. 300 तरुणी (अल्पवयींनासह) फूस लावून किंवा वेगवेगळी प्रलोभने दाखवून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच कौटुंबीक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्येही दुप्पट वाढ झाली आहे.
पुण्यात 8 महिन्यांत विनयभंगाच्या 364 घटना
मुंबईनंतर पुण्यात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. मागील 8 महिन्यांत पुण्यात विनयभंग व अश्लील वर्तनाच्या 364 घटना घडल्या आहेत. याच काळात पुण्यात 124 बलात्काराचे गुन्हे दाखल झालेत. नागपुरातही गत 8 महिन्यांत 304 महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडल्या; तर 165 महिलांवर बलात्काराच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत.
विनयभंग किंवा महिलांशी अश्लील वर्तनाच्या गुन्ह्यातील पीडितांमध्ये शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या घटनांतील आरोपींमध्ये टवाळखोर तरुणांचा समावेश आहे.
कुटुंबातील सदस्यांवरही विनयभंगाचे गुन्हे
याशिवाय नातेवाईक व कुटुंबातील सदस्यांवरही विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले आहेत. समाजात बदनामी होण्याच्या भीतीने बऱ्याच वेळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यापासून तरुणी परावृत्त होतात. याशिवाय पोलिसही काही प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.