IND VS AUS : ‘चहलला का घेतलं नाही? भांडणं झालं अन्…’, हरभजन सिंग सिलेक्टर्सवर संतापला, म्हणतो…

Harbhajan Singh On Yuzvendra Chahal : वर्ल्ड कपपूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात तीन वनडे सामने खेळवले जाणार आहे. त्यातील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या मैदानावर खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियामध्ये अभूतपूर्व बदल करण्यात आले आहेत. पहिल्या 2 सामन्यांसाठी वरिष्ठ खेळाडूंना आराम देण्यात आलाय तर केएल राहुलच्या (KL Rahul) खांद्यावर संघाची जबाबदारी देण्यात आली आहे. अशातच आता टीम इंडियाची माजी फिरकीपटू हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने सिलेक्टर्सवर खोचक टीका केली आहे. त्यावेळी त्याने यझुवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) का घेतलं नाही? असा खडा सवाल देखील विचारला आहे.

नेमकं काय म्हणाला Harbhajan Singh ?

युझवेंद्र चहलला इथं यायला हवं होतं. त्याला संधी देण्यात आलेली नाही, हे माझ्या समजण्याच्या पलीकडे आहे. एकतर तो कुणाशी भांडला असेल किंवा कुणाला काही बोलला असेल, मला माहीत नाही. जर आपण फक्त कौशल्याबद्दल बोललो तर त्याचं नाव या संघात असायला हवं होतं कारण टीम इंडियाचे बरेच खेळाडू विश्रांती घेत आहेत, असं म्हणत हरभजन सिंहने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

आशिया कप चालू असताना ऑस्ट्रेलियाचा संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला तर भारताचा संघ पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्ध खेळत होता. ऑस्ट्रेलिया हा वेगळा संघ आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल कारण त्यांच्याकडे सातव्या किंवा आठव्या क्रमांकापर्यंत चांगली फलंदाजी आहे आणि त्यांच्याकडे ठोस हिटर आहेत. त्यामुळे तुम्हाला स्पिनर्सवर भर द्यावा लागेल, असं हरभजन सिंह म्हणतो.

Related News

दरम्यान, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव आणि टिळक वर्मा या फलंदाजांना ऑस्ट्रेलियाविरुद्ध संधी देण्यात आलीये. तर वॉशिंग्टन सुंदर आणि आर अश्विन या दोन ऑफस्पिनर्सला देखील संघात स्थान देण्यात आलंय. त्यामुळे आता आशिया कपमध्ये जी चूक केली, ती चूक रोहित शर्मा आता सुधारत असल्याचं दिसून येतंय.

पहिल्या दोन सामन्यासाठी टीम इंडिया:

केएल राहुल (C), रवींद्र जडेजा (VC), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, इशान किशन (WK), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण

IND vs AUS च्या तिसऱ्या सामन्यासाठी टीम इंडिया :

रोहित शर्मा (C), हार्दिक पंड्या, (VC), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (WK), इशान किशन (WK), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल*, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *