IND vs AUS: वर्ल्ड कप फायनलवर पावसाचं सावट? अहमदाबादचं हवामान कसं असेल? जाणून घ्या

Ahmedabad Weather Report: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया हे जगातील दोन महान संघ वर्ल्ड कप 2023 च्या ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी एकमेकांना भिडतील. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 5 वेळा तर भारताने 2 वेळा  वर्ल्ड कप जिंकला आहे. या सामन्यावर जगाचे लक्ष असणार आहे. हा सामना आज भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता खेळवला जाईल. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरवर साधारण 1 लाख 30 हजार प्रेक्षक या ऐतिहासिक सामन्याचे साक्षीदार होणार आहेत. तर भारतासह जगभरातील करोडो क्रिकेट चाहत्यांचे या मॅचकडे लक्ष लागले आहे. दरम्यान भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यादरम्यान हवामान कसे असेल? याची चिंता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यात पावसाचा व्यत्यय तर येणार नाही ना? बदलत्या हवामानामुळे मॅच पाहण्यात अडथळा येणार नाही ना? अशी चिंता क्रिकेट चाहत्यांना लागली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) अहमदाबाद येथील हवामानासंदर्भात अपडेट दिली आहे. रविवारी अहमदाबादमध्ये हवामान स्वच्छ असेल. दोन्ही संघांमधील ऐतिहासिक सामन्यासाठी हवामान पूर्णपणे अनुकूल असेल, असे सांगण्यात आले आहे. 

इंडिया-ऑस्ट्रेलिया मॅचदरम्यान चमकदार सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश पाहायला मिळेल. यासोबतच सर्वोच्च तापमान सुमारे 33 अंश तर किमान तापमान 20 अंशांच्या आसपास असेल. 

Related News

वर्ल्ड कप 2023 च्या भारत- ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नसल्याचे आयएमडीने स्पष्ट केले आहे. हवामान पूर्णपणे स्वच्छ असेल. त्यामुळे संपूर्ण 100 षटकांचा सामना हवामानाच्या दृष्टीने पूरक असल्याचे सांगण्यात आले आहे.

अहमदाबादचे किती असेल तापमान?

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर दुपारी 12 वाजता सामना सुरू होणार आहे. त्यावेळी 31 ते 32 अंश तापमान असू शकते. तर रात्री हे तापमान कमी होईल, असा अंदाज अहमदाबाद हवामान केंद्राने वर्तवला आहे. अहमदाबादचे किमान तापमान 18 ते 20 अंशांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. दिवाळीनंतर राज्यात थंडी वाढली आहे. त्यामुळे तापमानात घट झाली असल्याची माहिती  केंद्राच्या संचालक डॉ.मनोरमा मोहंती यांनी दिली.

भारत-ऑस्ट्रेलियातील सामना पाहताना क्रिकेटप्रेमींना कडक उन्हाचा सामना करावा लागणार नाही, असे हवामान खात्याने सांगितले. ईशान्येकडील थंड वाऱ्यांमुळे थंडीत सातत्याने वाढ होणार असल्याचेही हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

फ्री स्ट्रिमिंग

भारतीय वेळेनुसार दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. असे असले तरी याचा समारंभ सोहळा दुपारी 12:30 वाजल्यापासून पाहता येणार आहे. क्रिकेटप्रेमींना डिजिटल स्क्रीनवर हा सोहळा पाहता येईल. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक फायनलचे विनामूल्य थेट प्रवाह Disney+Hotstar अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध आहे . डिस्नीचे प्रीमियम वापरकर्ते वेबसाइट आणि अ‍ॅप दोन्हीवर HD स्ट्रीमिंगचा आनंद घेऊ शकतात. स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे विश्वचषक 2023 चे प्रसारण हक्क आहेत आणि फायनल स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स एचडी हिंदी, स्टार गोल्ड SD, SS1 तमिळ SD+HD, SS1 तेलुगु SD+HD, स्टार माँ गोल, SS1 वर प्रसारित केली जाणार आहे.   क्रिकेट चाहत्यांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरुन या मॅचचा आनंद लुटता येणार आहे.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *