IND vs IRE: आयर्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; जसप्रीत बुमराह भारताचा नवा कॅप्टन!

IND vs IRE Jasprit bumrah: आगामी आशिया कप स्पर्धेपूर्वी टीम इंडिया आयलँड दौऱ्यावर (India tour of Ireland ) जाणार आहे. त्यासाठी आता बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षापासून संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहच्या (Jasprit bumrah) खांद्यावर आता टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. आगामी आर्यलँडविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेसाठी जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा कॅप्टन (Indian Captain) असणार आहे. आला तो थेट म्हणूनच, असं म्हटलं तर आता वावगं ठरणार नाही.

कसा असेल दौरा?

भारतीय संघ आयलँड दौऱ्यावर तीन टी-ट्वेंटी सामने खेळणार जातील. पहिला सामना 18 ऑगस्ट रोजी खेळवला जाईल तर दुसरा सामना 20 ऑगस्ट आणि तिसरा सामना 23 ऑगस्टला असणार आहे. 

नव्या छाव्यांना संधी

आयलँड दौऱ्यावर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) टीम इंडियाचा उपकर्णधार (Vice Captain) असणार आहे. यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन यांना संघात स्थान देण्यात आलं आहे. तर जितेश शर्मा, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीवर देखील लक्ष असेल. हार्दिक पांड्या, शुभमन गिल, रवींद्र जडेजा, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज यांना आराम देत नव्या छाव्यांना संधी देण्यात आलीये.

आर्यलँड दौऱ्यासाठी टी-ट्वेंटी संघ: 

जसप्रीत बुमराह (C), ऋतुराज गायकवाड (VC), यशस्वी जयस्वाल, टिळक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन (WC), जितेश शर्मा (WC),  शिवम दुबे, डब्ल्यू सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.

आयर्लंड विरुद्ध vs इंडिया | टी 20 मालिकेचं वेळापत्रक (India vs Ireland Time table)

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, पहिला सामना, 18 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, दुसरा सामना, 20 ऑगस्ट.

आयर्लंड विरुद्ध टीम इंडिया, तिसरा सामना, 23 ऑगस्ट.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *