IND vs PAK IN WORLD CUP : ७ वर्षानंतर भारतात येणार पाकिस्तानचा संघ, पाक सरकारने दिली परवानगी | महातंत्र
महातंत्र ऑनलाईन डेस्क : जगभरातील क्रिकेटप्रेमींची लक्ष भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यावर असते. या विश्वचषकात पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान आमने-सामने असणार आहेत. भारतात खेळवणाऱ्या विश्वचषकासाठी पाकिस्तानच्या संघाला भारतात पाठवण्यासाठी अडचणी येत होत्या. (IND vs PAK IN WORLD CUP) मात्र, आता सर्व अडचणी दूर झाल्या आहेत. पाकिस्तान सरकारने अखेर पाकिस्तानच्या क्रिकेट संघाला भारतात येण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तब्बल ७ वर्षांनंतर पाकिस्तानचा संघ भारतात येणार आहे. यापूर्वी २०१६ च्या टी २० विश्वचषकासाठी पाकिस्तानने भारत दौरा केला होता. भारत आणि पाकिस्तान दरम्यान, १४ ऑक्टोंबर रोजी लढत होऊ शकते. हा सामना अहमदाबाजच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.(IND vs PAK IN WORLD CUP)

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने रविवारी (दि. ६) एक निवेदन जारी करून संघ भारतात पाठवण्याचा निर्णय जाहीर केला. या निवेदनात पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, त्यांना खेळ आणि राजकारण यांची सांगड घालायची नाही आणि त्यामुळे २०२३ च्या विश्वचषकासाठी त्यांचा संघ भारतात पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दोन्ही देशांमधील क्रीडा संबंधित बाबींच्या मार्गावर अडथळा ठरु नयेत. (IND vs PAK IN WORLD CUP)

पंतप्रधानांच्या समितीने पाठिंबा दिला होता (IND vs PAK IN WORLD CUP)

विश्वचषकासाठी संघ पाठवण्याबाबत निर्णय घेण्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. यात सरकारचे इतर अनेक मंत्रीही होते. या आठवड्याच्या सुरुवातीला समितीची बैठक झाली, ज्यामध्ये भुट्टो यांच्यासह बहुतांश मंत्र्यांनी संघ भारतात पाठवण्यास पाठिंबा दिला. त्यानंतरच सरकारने टीम पाठवण्याचा निर्णय घेतला. (IND vs PAK IN WORLD CUP)

हेही वाचलंत का?Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *