Ind vs Pak : आमच्यावेळी असं नव्हतं, पॅव्हेलिअमधल्या ‘या’ फोटोवर भडकला भारताचा दिग्गज फलंदाज

Asia cup 2023 India vs Pakistan : एशिया कप स्पर्धेत शनिवारी म्हणजे 2  सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) या कट्टर प्रतिस्पर्धांमध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यात टीम इंडियाने (Team India) पहिली फलंदाजी केली, पण यानंतर पावसाने हजेरी लावली आणि सामना रद्द करण्यात आला. यादरम्यान, पॅव्हेलिनमध्ये एका दृष्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. पॅव्हिलिअनमध्ये भारत आणि पाकिस्तानचे खेळाडू गळाभेट घेत होते, थट्टा मस्करी करताना दिसले होते. खेळाडूंनी एकमेकांच्या कामगिरीचं कौतुकही केलं. नेमक्या याच गोष्टीवर भारतीय क्रिकेट संघाच्या दिग्गज फलंदाजाने नाराजी व्यक्त केली आहे. 

गौतम गंभीरची टीका
भारत-पाकिस्तान खेळाडूंमधल्या खेळीमेळीच्या वातावरणावर भारताचा दिग्गज फलंदाज गौतम गंभीरने (Gautam Gambhir) टीका केली आहे. खेळाडूंनी सामन्यादरम्यान मैत्री राखू नये, तर त्यांच्या नजरेत एकमेकांच्या संघाविरुद्ध आक्रमकता असली पाहिजे, असं गौतम गंभीरने म्हटलं आहे. सामन्यादरम्यान दोन संघाचे खेळाडू एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवतायत, एकमेकांची गळाभेट घेतायत, आमच्यावेळी असं होत नव्हतं. फ्रँचाईजी क्रिकेटमुळे हे सर्व होत असल्याटी टीका गंभीरने केली आहे. सामन्यावेळी खेळाडूच्या डोळ्यात आक्रमकता असायला हवी. कारण त्यावेळी खेळाडू देशाचं प्रतिनिधीत्व करत असतो. आपल्या देशाला जिंकून देण्याचा तो पूर्ण प्रयत्न करत असतो, असं गंभीरने म्हटलं आहे. 

सामना संपल्यानंतर म्हणजे 6 ते 7 तासांनंतर मैदानावर तुम्हाला जी काही मैत्री करायची आहे ती करा पण, सामन्याच्या त्या सहा ते सात तासात संपूर्ण लक्ष खेळावर असायला हवं. कारण आपल्या अंगावर केवळ टीम इंडियाची जर्सी नसते तर 140 कोटी लोकांचं प्रतिनिधीत्व आपण करत असतो, असं गंभीरने म्हटलं आहे. 

Related News

हॅरिस रौफचा अॅटीट्यूड
भारत आणि पाकिस्ताना साममन्यात मैदानावर आणखी एक दृश्य पाहिला मिळालं. पाकिस्तान गोलंदाज हॅरिस रौफने गोलंदाजी करताना ईशान किशनला राग दिला होता. हॅरिस रौफने 82 धावांवर खेळणाऱ्या ईशानला आऊट केलं. त्यानंतर हॅरिसने बोटाने इशारा करत ईशानला पॅव्हेलिनमध्ये जा असं डिवचलं होतं. हॅरिस रौफच्या या वागणूकीमुळे सोशल मीडियावर त्याला चांगलंच ट्रोल करण्यात आलं होतं. 

पावसामुळे सामना रद्दा
एशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. टीम इंडियाने 48.5 षटकात 266 धावा केल्या. भारताची सुरुवातच खराब झाली. अवघ्या 66 धावांवर भारताने 4 विकेट गमावले होते. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला शाहिन शहा आफ्रिदीने क्लीन बोल्ड केलं होतं. त्यानंतर मैदानावर आलेल्या ईशान किशन आणि उपकर्णधारा हार्दिक पांड्याने पाचव्या विकेटसाठी तब्बल 138 धावांची पार्टनरशीप करत भारताला संकटातून बाहेर काढलं. 

हार्दिक पांड्याने सर्वाधिक 87 धावा केल्या. यात त्याने  7 चौकार आणि 1 षटकार लगावला. तर ईशान किशनने 82 धावा केल्या. पाकिस्तानतर्फे शाहीन आफ्रिदीने सर्वाधिक 4 विकेट घेतल्या. Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *