IND vs PAK : ज्या सामन्याची उत्सुकता तो सामना अखेर सुरु झालाय. श्रीलंकेतील कॅंडी शहरातील पल्लेकेले स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. चाहते या सामन्याची कधी पासून वाट पाहत होते. अखेर या सामन्यात टीम इंडियाने ( Team India ) टॉस जिंकून या सामन्यात प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान अजून 4 वेळा भारत-पाकिस्तान ( India-pakistan ) एकमेकांशी भिडणार आहेत. यामध्ये एशिया कप आणि वर्ल्डकप या दोन्हीमध्ये भारत -पाकिस्तान ( India-pakistan ) एकूण 4 वेळा एकमेकांशी भिडणार आहेत.
आशिया कपमध्ये तीनवेळा भिडणार भारत-पाक
2 सप्टेंबर रोजी भारत-पाक सामना होतोय. यामध्येच जर भारत-पाकिस्तान दोन्ही टीम्स एशिया कपच्या सुपर 4 स्टेजमध्ये क्वालिफाय केलं तर यानंतर दोन्ही टीम्स 10 सप्टेंबर रोजी एशिया कपच्या सुपर 4 स्टेजमध्ये एकमेकांशी भिडणार आहेत. अशातच जर दोन्ही टीम्स पुन्हा फायनलमध्ये पोहोचल्या तर एशिया कपमध्ये भारत – पाकिस्तान ( India-pakistan ) सामना 3 वेळा पहायला मिळणार आहे.
वनडे वर्ल्डकपमध्ये भिडणार भारत-पाकिस्तान
वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाचा ( Team India ) सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. यानंतर जर टीम इंडिया आणि पाकिस्तानने वर्ल्ड कप 2023 मध्ये चांगली कामगिरी केली, तर वर्ल्ड कप 2023 चा सेमीफायनल किंवा फायनल मॅचही टीम इंडिया आणि पाकिस्तानमध्ये खेळवला जाऊ शकतो.
Related News
इथं व्हिसा मिळायचे वांदे, पण बाबरला विश्वास… म्हणतोय ‘आमचे 1 लाख फॅन्स येणार!’
World Cup Trophy in Pune : पुणेकरांनो संधी सोडू नका…! ‘या’ वेळेत निघणार वर्ल्ड कप ट्रॉफीची भव्य मिरवणूक
Mohammed Siraj : मिस यू पप्पा! वडिलांच्या आठवणीत सिराज झाला भावूक; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत
क्रिकेटवर पुन्हा फिक्सिंग सावट? आशिया कपची फायनलवरून मोठा राडा; पोलीस चौकशी करणार!
ODI World Cup 2023 Song: वर्ल्ड कपचं थीम साँग लाँच, रणवीर सिंगचा धमाल डान्स… Video पाहाच
21 धावांत 6 विकेट्स घेणाऱ्या सिराजसाठी दिल्ली पोलिसांचं खास गिफ्ट! म्हणाले, ‘सिराजला…’
World Cup 2023 | “टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल पण…”, कपिल देव यांची मोठी भविष्यवाणी!
Rohit Sharma : आता वर्ल्डकप जिंकल्यानंतर…; प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितच्या वक्तव्यामुळे चाहते खूश
‘तुम्ही मोहम्मद सिराजलाच काय ते विचारा…’, श्रद्धा कपूरच्या स्टेटसमुळे चर्चांना उधाण
टीम इंडियासोबत सेलिब्रेशन करणारा तो मिस्ट्रीमॅन कोण, रोहितने सरळ त्याच्याच हाती का दिली ट्रॉफी?
Dasun Shanaka : मला माफ करा… लाजिरवाण्या पराभवानं श्रीलंकेचा कर्णधार इतका खचला की क्रिकेटप्रेमीही भावूक
Rohit Sharma : रोहितपेक्षा विसरभोळा गोकूळ तरी परवडला; साखरपुड्याच्या अंगठीनंतर हिटमॅन पुन्हा ‘ही’ गोष्ट विसरला
2 सप्टेंबर सामन्यासाठी दोन्ही टीम्सची प्लेईंग 11
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, इशान किशन (WK), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (WK), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.
भारत – पाकिस्तान सामन्यांची संभाव्य तारिख
- 10 सप्टेंबर 2023 : आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलोंबो
- 17 सप्टेंबर 2023 : आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलोंबो
- 14 ऑक्टोबर 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
- 19 नोव्हेंबर 2023 : नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद