IND vs PAK: रोहित शर्माला काय साध्य करायचं होतं? मॅचविनर खेळाडूलाच ठेवलं बाहेर… क्रिकेट चाहते संतापले

India vs Pakistan: एशिया कप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय क्रिकेट (Team India) संघात मोठा बदल करण्यात आला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) घेतलेल्या या निर्णयमुळे सोलश मीडियावर त्याच्याविरुद्ध क्रिकेट चाहते संताप व्यक्त करत आहेत. कर्णधार रोहित शर्माने मॅच विनर खेळाडू मोहम्मद शमीलाच (Mohammed Shami) संघाबाहेर ठेवलं आहे. प्लेईंग इलेव्हनमधून शमीला डच्चू देत रोहित शर्माने ऑलराऊंडर शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) संधी दिली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फलंदाजी मजबूत करण्यासाठी रोहित शर्माने शमीला बाहेर ठेवण्याच्या निर्णयावर आता प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

मोहम्मद शमीचा एकदिवसीय क्रिकटेमध्ये दमदार रेकॉर्ड आहे. भारतासाठी आतापर्यंत खेळलेल्या 90 एकदिवसीय सामन्यात शमीने तब्बल 162 विकेट घेतल्या आहेत. यात एका सामन्यात पाच विकेट घेण्याची त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. असं असताना मोहम्मद शमीला बाहेर ठेवण्याचा निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. मोहम्मद शमी विंडीज दौऱ्यापासून टीम इंडियातून बाहेर आहे. 

कर्णधार रोहित शर्माने शमीऐवजी युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजवर (Mohammed Siraj) विश्वास दाखवला. दुसरा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून संघात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आहे. तर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूरचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. 

Related News

मोहम्मद शमीची दमदार कामगिरी
मोहम्मद शमी टीम इंडियाचा प्रमुख आणि अनुभवी गोलंदाज आहे. शमी भारतासाठी आतापर्यंत 64 कसोटी, 90 एकदिवसीय सामने आणि 23 टी20 सामने खेळला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये शमीच्या नावावर तब्बल 229 विकेट जमा आहेत. एकदिवसीय सामन्यात 162 तर टी20 क्रिकेटमध्ये 24 विकेट त्याने घेतल्या आहेत. 

टीम इंडियाला एकामागोमाग एक धक्के
कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय टीम इंडियाच्या चांगलाच अंगलट आला. सलामीवीर रोहित शर्मा आणि टीम इंडियाचा बॅकबोन विराट कोहली बाद झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं. पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीने दोघांनाही क्लिन बोल्ड केलं. रोहित आणि विराट स्वस्तात पॅव्हेलिअनमध्ये परतले.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, इशान किशन (WK), विराट कोहली, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): फखर जमान, इमाम-उल-हक, बाबर आझम (C), मोहम्मद रिझवान (WK), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *