IND vs PAK: 9 ऑगस्ट रोजी रंगणार भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज सामना, कुठे पाहता येणार सामना?

Asian Champions Trophy 2023 : एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात झाली असून टीम इंडियाने यामध्ये सहभाग घेतला आहे. अशातच आता एशियन गेम्समध्येही ( Asian Champions Trophy 2023 ) भारत-पाकिस्तान हा हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. 9 ऑगस्ट रोजी भारत आणि पाकिस्तान ( IND vs PAK Hockey Match ) एकमेकांशी भिडणार आहेत. हा सामना कुठे पाहता येणार ते पाहुयात.

आमने-सामने येणार भारत-पाकिस्तान 

एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ( Asian Champions Trophy ) मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या हॉकीचा ( IND vs PAK Hockey Match ) महामुकाबला होणार आहे. चेन्नईच्या मेयर राधाकृष्णन स्टेडियममध्ये हा सामना रंगणार असून चाहते, मात्र हा सामना पाहण्यासाठी उत्सुक आहेत. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर चाहते या सामन्याचा आनंद घेऊ शकणार आहेत. 

याशिवाय फॅनकोड या अॅपवरून ऑनलाईन लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. भारत आणि पाकिस्तान ( IND vs PAK Hockey Match ) या दोन्ही टीम हॉकीच्या मैदानावर 178 वेळा एकमेकांशी भिडले आहेत यावेळी पाकिस्तन 82 वेळा तर टीम इंडिया 64 वेळी विजयी ठरली आहे. त्याचप्रमाणे 32 वेळा सामने ड्रॉ झाले आहेत. 

Related News

कशी असेल टीम इंडिया ( Team India ) ?

गोलकीपर : पीआर श्रीजेश, कृष्ण बहादुर पाठक

डिफेंडर : जर्मनप्रीत सिंह, सुमित, जुगराज सिंह, हरमनप्रीत सिंह (कर्णधार), वरुण कुमार, अमित रोहिदास

मिडफील्डर : हार्दिक सिंह (उप-कर्णधार), विवेक सागर प्रसाद, मनप्रीत सिंह, नीलकंठ शर्मा, शमशेर सिंह

फॉरवर्ड्स : आकाशदीप सिंह, मनदीप सिंह, गुरजंत सिंह, सुखजीत सिंह, एस कार्थी

कशी असणार आहे पाकिस्तानची टीम?

मुहम्मद उमर भट्टा (कर्णधार), अकमल हुसैन, अब्दुल्ला इश्तियाक खान, मुहम्मद अब्दुल्ला, मुहम्मद सुफियान खान, एहतशाम असलम, ओसामा बशीर, अकील अहमद, अरशद लियाकत, मुहम्मद इमाद, अब्दुल हनान शाहिद, जकारिया हयात, राणा अब्दुल वहीद अशरफ (उप कर्णधार), रोमन, मुहम्मद मुर्तजा याकूब, मुहम्मद शाहजेब खान, अफराज, अब्दुल रहमान.

स्टँडबाय खेळाडू : अली रजा, मुहम्मद बाकिर, मुहम्मद नदीम खान, अब्दुल वहाब, वकार अली, मुहम्मद अरसलान आणि अब्दुल कय्यूम.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *