IND vs SL Final : टीम इंडियाची चारही बोटं तुपात; वर्ल्ड कपपूर्वी रोहित शर्माने ‘ती’ चूक सुधारली!

IND vs SL, Washington Sundar : गेल्या 20 दिवसांपासून ज्याची प्रतिक्षा होती, तो क्षण आता आला आहे. भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात आर प्रेमदासा स्टेडियममध्ये फायनल सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने एक महत्त्वाचा बदल केलाय. आजच्या सामन्यासाठी अनुपस्थित असलेल्या अक्षर पटेलच्या जागी टीम इंडियाने नव्या दमदार खेळाडूला संधी दिलीये. त्यामुळे आता टीम इंडियाचे चारही बोटं तुपात असल्याची चर्चा सुरू झालीये. वर्ल्ड कपपूर्वी (World Cup) रोहितने केलेली ती चूक सुधारली, असं क्रिडातज्ज्ञांचं म्हणणं आहे. रोहितने नेमका कोणता निर्णय घेतला आणि का? ते पाहुया…

टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू अक्षर पटेल याला दुखापतीमुळे संघात स्थान देण्यात आलं नाही. त्याच्या जागी आता एक दिवसापूर्वी संघात सामील झालेल्या वॉशिंग्टन सुंदरचा (Washington Sundar) थेट प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केलाय. एकीकडे शार्दुल ठाकूर चांगल्या फॉर्ममध्ये असताना त्याला खाली बसवून सुंदरला संधी दिल्याने अनेकांनी भूवया उंचावल्या आहेत. मात्र, रोहितने घेतलेला निर्णय योग्य पहायला मिळतंय.

सुंदरला संधी का?

भारत आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या आशिया कपमधील सामन्यात टीम इंडियाला सर्वात जास्त त्रास दिला तो चारिथ असलंका याने. श्रीलंकन संघाची सर्वात मोठी ताकद म्हणजे चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका यांची तिघडी… ही मोडून काढण्यासाठी टीम इंडियाला एका ऑफ स्पिनरची गरज होती. त्यामुळे अक्षर जखमी असताना रोहितने थेट वॉशिंग्टन सुंदरची आठवण काढली. श्रीलंकेच्या मिडल ऑर्डर मोडून काढण्यासाठी ऑफ स्पिनरचा महत्त्वाचा रोल राहिलाय. तिच चूक आता रोहित शर्माने सुधारली आहे. आगामी वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियामध्ये एकही ऑफ स्पिनर नसल्याने रोहित शर्मा आणि सिलेक्टर्सवर टीका झाली होती. आता वर्ल्ड कपसाठी कोणता निर्णय घेतला जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. 

Related News

आणखी वाचा – पाकिस्तानला नाचवणाऱ्या कुलदीप यादवच्या ‘जर्सी नंबर 23’ चं रहस्य काय?

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : 

भारतीय संघ: रोहित शर्मा (C), हार्दिक पांड्या (WK), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, इशान किशन , सूर्यकुमार यादव.

आशिया कप फायनल- श्रीलंका प्लेइंग 11: 
पथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदिरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजय डी सिल्वा, दासुन शनाका (कर्णधार), दुनिथ वेल्स, दुशन हेमंथा, प्रमोद मदुशन, मथिशा पाथिराना.

आशिया कप फायनल- टीम इंडिया प्लेइंग 11: 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल (विकेटकीपर), इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *