IND vs SL Final : 17 सप्टेंबर रोजी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यामध्ये एशिया कपचा फायनल महामुकाबला रंगणार आहे. आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये या दोन्ही टीम आमने-सामने येणार आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यापैकी कोण बाजी मारणार हे पाहवं लागणार आहे. यापूर्वी टीम इंडियने 7 वेळा तर श्रीलंकेने 6 वेळा एशिया कपच्या टायटलवर आपलं नाव कोरलंय. मात्र आजच्या दिवशी देखील पावसामुळे चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार, आज कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे फायनलच्या सामन्यात पावसाचा खेळ होण्याची शक्यता आहे.
फायनल सामन्यात पावसाचा व्यत्यय?
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील अंतिम सामना आर प्रेमदासा स्टेडियममध्ये रंगणार आहे. पण या सामन्यापूर्वी चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आलीये. रविवारी कोलंबोमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलीये. मात्र जर पाऊस पडला तर Reserve Day चे नियम काय आहेत, ते आज आपण जाणून घेऊया.
Related News
Maharashtra Rain : राज्याचा काही भाग वगळता बहुतांश जिल्ह्यांत पावसाची संततधार; कुठे जोर ओसरला?
नागपुरात रस्त्यांना नदीचे रुप: पुरात शेकडो नागरिक अडकले, बचावकार्यासाठी लष्काराला पाचारण; पाहा PHOTOS, VIDEOS
Maharashtra Rain : नागपूरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; राज्यात पुढील 48 तास पावसाचे, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Rain : राज्याच्या ‘या’ भागात पावसाळा, तर इथं उन्हाच्या झळा; पाहा हवामान वृत्त
Maharashtra Rain : कुठे दमट वातावरण तर, कुठे मुसळधार; कसं आहे राज्यातील आजचं हवामान? पाहा…
Mohammed Siraj : मिस यू पप्पा! वडिलांच्या आठवणीत सिराज झाला भावूक; इंस्टाग्राम स्टोरी चर्चेत
क्रिकेटवर पुन्हा फिक्सिंग सावट? आशिया कपची फायनलवरून मोठा राडा; पोलीस चौकशी करणार!
21 धावांत 6 विकेट्स घेणाऱ्या सिराजसाठी दिल्ली पोलिसांचं खास गिफ्ट! म्हणाले, ‘सिराजला…’
World Cup 2023 | “टीम इंडिया वर्ल्ड कप जिंकेल पण…”, कपिल देव यांची मोठी भविष्यवाणी!
Rohit Sharma : आता वर्ल्डकप जिंकल्यानंतर…; प्रेस कॉन्फरन्समध्ये रोहितच्या वक्तव्यामुळे चाहते खूश
‘तुम्ही मोहम्मद सिराजलाच काय ते विचारा…’, श्रद्धा कपूरच्या स्टेटसमुळे चर्चांना उधाण
टीम इंडियासोबत सेलिब्रेशन करणारा तो मिस्ट्रीमॅन कोण, रोहितने सरळ त्याच्याच हाती का दिली ट्रॉफी?
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये 80 टक्के पावसाचा अंदाज आहे. यावेळी काळे ढग असू शकतात. तर तापमान 29 अंश सेल्सिअस ते 24 अंशांपर्यंत राहील. तसंच ताशी 18 किलोमीटर वेगाने वारे वाहतील.
रिझर्व्ह डेला कधी खेळवला जाणार सामना?
फायनल सामन्यासाठी रिझर्व्ह डे ठेवण्यात आला आहे. त्यानुसार जर पाऊस पडला तर उर्वरित सामना 18 सप्टेंबर रोजी खेळवला जाणार आहे. मात्र आजच्या दिवशी म्हणजेच रविवारी दोन्ही टीम्सची 20 ओव्हर्स खेळवले गेले तर हा सामना रिझर्व्ह डे ला खेळवला जाणार नाही. यावेळी आजच्यात दिवशी या सामन्याचा निकाल लावण्यात येणार आहे.
रिझर्व्ह डेचे नियम काय आहेत?
जर हा सामना रिझर्व्ह डे ला खेळवला गेला तर जिथे 17 तारखेला सामना थांबवण्यात आलाय तिथूनच सामन्याला सुरुवात केली जाणार आहे. यावेळी पुन्हा नव्याने टॉस होणार नाही. दरम्यान हा सामना किती ओव्हर्सचा होणार हे अंपायर ठरवणार आहेत. त्यामुळे अंपायर्स जेवढ्या ओव्हर्सचा खेळ ठरवतील तितक्यांचा सामना खेळवण्यात येणार आहे.