IND vs SL : कोहलीच्या शतकासाठी देव पाण्यात पण विराट मदुशंकाच्या ट्रॅपमध्ये अडकला; पाहा नेमकं काय झालं?

India vs Sri Lanka : भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरू असलेल्या वर्ल्ड कप (World Cup 2023) सामन्यात विराट कोहलीने (Virat Kohli) दमदार 88 धावांची खेळी केली. पण पुन्हा एकदा सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यास विराट कोहलीला अपयश आलं आहे. क्रिकेटचा देव म्हटल्या जाणाऱ्या सचिन तेंडूलकरने (Sachin tendulkar) एकदिवसीय सामन्यात 49 शतक ठोकले आहेत. अशातच विराटने सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी संधी विराट कोहलीकडे होती. मात्र,  ऐतिहासिक विक्रमाची बरोबरी करण्याची किमया विराटला साधता आली नाही. विराट त्याच्या 49 व्या शतकापासून 12 धावा दूर राहिला अन् लाखो विराट फॅन्सचं मनं पुन्हा एकदा दुखावली गेली आहेत.

विराट कोहलीच्या शतकासाठी अनेक फॅन्सने देव पाण्यात ठेवले होते. मात्र, दिलशान मदुशंकाच्या (Dilshan Madushanka) ट्रॅपमधून विराटची देखील सुटका झाली नाही अन् श्रीलंकेचा डाव यशस्वी राहिला. विराट कोहलीने किंग साईज खेळी केली. त्याने 94 बॉलमध्ये 84 धावांची खेळी केली. त्यात त्याने 11 फोर देखील मारले आहेत. मात्र, दिलशान मदुशंका याने टप्प्यात कार्यक्रम करत विराट फॅन्सला आणखी एका प्रतिक्षा करण्याची विनंती केली आहे.

नेमकं काय झालं?

विराट कोहली आणि शुभमन गिल धुंवाधार फलंदाजी करत होते. दोन्ही खेळाडू शतकांच्या जवळ होते. त्यावेळी कुसल मेंडिस याने दिलशान मदुशंका याला पुन्हा गोलंदाजीला बोलवलं. दिलशान मदुशंका याने 30 व्या ओव्हरमध्ये शुभमन गिलला अडकवलं अन् कुशल मेंडिसच्या हातात सोपा कॅच सोपवला. तर त्यानंतर सलग 32 व्या ओव्हरमध्ये मेंडिसने कव्हर्सला फिल्डर लावला आणि एका उसळत्या बॉलवर विराट बॉल स्लेस करण्याच्या नादात बाद झाला. निसंकाने कव्हर्सकडून मिड ऑफच्या दिशेने झेप घेत विराटचा कॅच घेतला अन् अख्खं वानखेडे स्टेडियम शांत झालं.

Related News

श्रीलंका (प्लेइंग इलेव्हन): पाथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस (W/C), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंथा, महेश थेक्षाना, कसून रजिथा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (W), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *