IND vs WI 2nd T20I: वर्ल्ड कप सोडा वेस्ट इंडिजला हरवता येईना; टीम इंडियाचा 2 विकेट्सने लाजिरवाणा पराभव!

West Indies Beat India In 2nd T20I:

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यात वेस्ट इंडिजने (IND vs WI 2nd T20) भारताला दारूण पराभव केला आहे. हा सामना जिंकताच आता वेस्ट इंडिजने पाच सामन्याच्या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. दुसरा सामना वेस्ट इंडिजने 2 विकेट्सने जिंकला. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने (Nicholas Pooran) दमदार अर्धशतक ठोकत 61 धावांची खेळी केली. त्यामुळे आता भारताला सलग दोन सामन्यात पराभवाचं तोडं पहावं लागलंय. आता येणारे तिन्ही सामने टीम इंडियासाठी करो या मरो असे असणार आहेत.

भारताने दिलेल्या 153 धावांचं आव्हान पार करताना वेस्ट इंडिजची दैना उडाली. कॅप्टन हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) सलग दोन झटके देत वेस्ट इंडिजला बॅकफूटवर पाठवलं. त्याचवेळी मैदानात आलेल्या निकोलस पूरनने मैदानात ठाव मांडला आणि हळूहळू सेट होण्यास सुरूवात केली. त्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी करत धावगती वाढवली. त्याने 40 बॉलमध्ये 6 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने 67 धावांची दमदार फलंदाजी केली. निकोलसने 167 च्या स्टाईक रेटने आघात केला. त्यामुळे वेस्ट इंडिजचा विजय सोपा झाला होता. शेवटच्या 4 ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला 24 धावा हव्या होत्या. त्यावेळी भारताच्या फिरकीपटूंनी गेम फिरवला 3 ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी 4 विकेट घेत मॅचमध्ये कमबॅक केलं.

Related News

मुकेश कुमारने मैदानात तळ ठोकून बसलेल्या निकोलस पुरनला तंबुत पाठवलं. त्यानंतर हार्दिक पांड्याने कॅरेबियन खेळाडूंना फिरकीच्या तालावर नाचवलं. शेपयार्ड, होल्डर आणि हेटमायर झटपट बाद झाले. चहलने दोघांना घरचा रस्ता दाखवला. मात्र, अखेर अकेल होसेन आणि अल्झारी जोसेफ यांनी संयमी खेळी करत वेस्ट इंडिजचा विजय खेचून आणला.

दरम्यान, प्रथम टॉस जिंकून फलंदाजी करताना टीम इंडियाच्या फलंदाजांनी एकामागोमाग एक विकेट सोडल्या. शुभमन गिल आणि इशान किशन स्वस्तात परतले. टीम इंडियाला लागलं ‘सूर्य’ग्रहण लागलंय. तर गिलला देखील मोठी कामगिरी करता आली नाही. ईशान किशनच्या कॉलवर सूर्यकुमार धावबाद झाला. वनडेमध्ये सोडा टी-ट्वेंटीतही बॅट तळपत नसल्याचं समोर आलंय. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तिलक वर्माने (Tilak Varma) दमदार अर्धशतक ठोकलं आहे. 39 बॉलमध्ये पाच फोर आणि एका खणखणीत सिक्सच्या मदतीने त्यांने अर्धशतक साजरं केलं.

आणखी वाचा – तिलक वर्माने मोडला ऋषभ पंतचा रेकॉर्ड; अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय!

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): 

ब्रँडन किंग, काइल मेयर्स, जॉन्सन चार्ल्स, निकोलस पूरन (WK), रोव्हमन पॉवेल (C), शिमरॉन हेटमायर, रोमॅरियो शेफर्ड, जेसन होल्डर, अकेल होसेन, अल्झारी जोसेफ, ओबेद मॅककॉय.

भारत (प्लेइंग इलेव्हन): 

इशान किशन (WK), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (C), संजू सॅमसन, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, मुकेश कुमार, रवी बिश्नोई.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *