Ind vs WI : टीम इंडियासाठी आज ‘करो या मरो’ वेस्टइंडिजविरुद्ध आज उतरणार ‘हा’ हुकमी एक्का

India Vs West Indies 3rd T20 Match: कसोटी आणि एकदिवसीय मालिकेनंतर टीम इंडिया वेस्ट इंडिजविरुद्धची टी20 ही मालिका (T20 Series) जिंकणार का? अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना आता मालिका वाचवण्याची वेळ टीम इंडियावर आलीय. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) युवा संघाला पराभव पत्करावा लागला आहे. आज तिसरा टी20 सामना खेळवला जाणार असून मालिका वाचवण्यासाठी टीम इंडियासाठी (Team India) हा करो या मरोचा सामना असणार आहे. तिसरा सामा गयानात खेळला जाणार असून भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता हा सामना खेळवला जाणार आहे. 

पहिल्या दोन सामन्यात युवा फलंदाज शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन सपशेल फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे तिसऱ्या सामन्यात तिघांपैकी एकाचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. या सामन्यात टीम इंडिया आपला हुकमी एक्का उतरवणार असल्याची शक्यता आहे. भारताचा स्टार सलामीवीर यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) तिसऱ्या सामन्यात संधी मिळू शकते. असं झालं तर यशस्वीचा हे टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधलं पदार्पण ठरणार आहे. 

गयानाची धीमी खेळपट्टी
गयानाची खेळपट्टी धीमी असल्याने फलंदाजांना धावा करण्यास कष्ट करावे लागतायत. झटपट धावा करण्याच्या नादात फलंदाज आपली विकेट गमावत आहेत. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पांड्याने हे कबुल केलं आहे. 

Related News

सात वर्षांनंतर विक्रम मोडणार
आता सुरु असलेल्या पाच टी20 सामन्यांच्या मालिकेतील दोन सामने वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. तिसरा सामना जिंकल्यास विंडिजच्या नावावर ही मालिका होणार आहे. आणि असं झाल्यास तब्बल सात वर्षांनंतर विंडीज भारताविरुद्ध टी20 मालिका जिंकणार आहे. याआधी वेस्टइंडिजने 2016 मध्ये भारताविरुद्धची टी20 मालिका जिंकली होती. 

शुभमन गिल, सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसन हे टी20 चॅम्पियन खेळाडू विंडीजमध्ये फ्लॉप होत असताना युवा तिलक वर्माने मात्र आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दुसऱ्या सामन्यात विंडीच्या गोलंदाजांसमोर इतर फलंदाज पॅव्हेलिअनमध्ये परतत असताना तिलक वर्माने मात्र अर्धशतकी खेळी केली होती. 

टीम इंडियाला धोका पूरनचा
टीम इंडियासमोर प्रमुख आव्हान आहे ते वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज निकोलस पुरनचं. डावखुरा निकोलस पूरन सध्या जबदस्त फॉर्मात आहे. दुसऱ्या टी20 सामन्यात पूरनने एकहाती सामना जिंकून दिला होता. याशिवाय विंडीजचं शेपूट गुंडाळण्यातही भारतीय गोलंदाज अपयशी ठरले होते. 

टी20 मालिकेतील दोनही संघ

भारतीय टीम : हार्दिक पंड्या (कर्णधार), ईशान किशन, शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

वेस्टइंडीज टीम : रोवमैन पॉवेल (कर्णधार), काइल मायर्स, जॉनसन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरोन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेड मैकॉय, निकोलस पूरन, रोमारियो शेफर्ड, ओडियन स्मिथ, ओशाने थॉमस.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *