IND vs WI 2nd T20I: सात्त्याने टीम इंडियाच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली या फलंदाजांना वगळता इतर खेळाडू वर्ल्ड कप खेळणार की नाही? यावर अद्याप प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वर्ल्ड कपसाठी (CWC 2023) नंबर 4 ची लढाई अद्याप कायम आहे. यासाठी सध्याच्या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली आहे. मात्र, संजूने अपेक्षेप्रमाणे चांगली खेळी केली नाही. संजूला पहिल्या दोन सामन्यांमध्ये काही खास कामगिरी करता आली नाही. दुसऱ्या सामन्यात तो सात चेंडूत सात धावा करू तंबूत परतला. यावर बोट ठेवत देत पार्थिव पटेलने (Parthiv Patel) भारतीय खेळाडूला खडेबोल आहेत.
काय काय म्हणाला पार्थिव पटेल?
जेव्हा जेव्हा टीम इंडियाला पराभव स्विकारावा लागतो, त्यावेळी नकारात्म गोष्टींकडे आपलं लक्ष जातं. व्हाईट बॉल सिरीजमध्ये फलंदाजांनी कसं जास्त वेळ मैदानात टिकलं पाहिजे, याकडे आपण लक्ष देतो. मात्र, जेव्हा संजू सॅमसनला टीम इंडियामध्ये घेत नाही, तेव्हा त्याच्याबद्दल चर्चा होते. पण हे सुद्धा खरं आहे की त्याला भरपूर संधी मिळाल्या आहेत, पण त्याला त्याला फायदा घेता आला नाही, असं पार्थिव पटेल म्हणाला आहे.
मला असं वाटतं की त्याची वेळ निघून चालली आहे. सॅमसनला अनेकदा संधी मिळाली आहे. मात्र, त्याला संधीचं सोनं करता आलं नाही. मागील काही सामन्यात आपण फक्त तिलक वर्मा याला चांगलं खेळताना पाहिलंय. संजू सॅमसनला त्याच्या क्षमतेवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. संजूने त्याला त्याच्या शॉट सिलेक्शनवर विश्वास ठेऊन मैदानात उतरण्याची गरज आहे, जर त्यानं असं केलं तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठं नाव कमवेल, असं पार्थिव पटेल म्हणाला आहे.
Related News
सर्वोत्तम फॉर्ममध्ये असलेल्या शुभमन गिलसंदर्भात वर्ल्डकपआधीच भारतीय संघाचा मोठा निर्णय
शुभमननं बाबरला कोलला! ‘हा’ विक्रम केला नावावर; पुढलं टार्गेट ICC Ranking मध्ये नंबर 1 चं
BAN vs NZ: या पुढेही आम्ही मंडकिंग करणार…; ईश सोढीला माघारी बोलवण्याच्या मुद्द्यावरून बांगलादेशी खेळाडू नाराज
‘तुम्ही कॉमेन्ट्री बॉक्समध्ये एसीत बसून…’; शामी स्पष्टच बोलला! ‘तो’ प्रश्न विचारुन हर्षा भोगले फसले
विजयानंतर सूर्याने मध्यरात्री केलेल्या ‘त्या’ कृत्याने सेहवाग चिडून म्हटला, ‘सलग 3 वेळा शून्यावर…’
NZ vs BAN : मंकडिंग, ड्रामा अन् ईश सोढीची गळाभेट! शेवटी लिटन दासने काळीज जिंकलं; पाहा Video
Rahul Dravid : राहुल द्रविडच्या लेकाची अचानक टीममध्ये एन्ट्री; बापासारखा तगडा बॅटर
Sanju Samson : संजू सॅमसनला टीम इंडियात स्थान का मिळत नाही? श्रीसंतने पहिल्यांदाच केला मोठा खुलासा
WC 2023 : वर्ल्ड कपसाठी पाकिस्तान संघाची घोषणा, 2 मॅचविनर खेळाडू बाहेर..
27 वर्षांत जे घडलं नाही ते केलं तरच…; Ind vs Aus सामन्याआधीच समोर आली धक्कादायक आकडेवारी
World Cup 2023: विश्वचषक स्पर्धेआधी संघात मोठा बदल, 2 खेळाडू बाहेर, यांना मिळाली संधी
Indian Team Jersey : टीम इंडियाची नवी जर्सी पाहिलीत का? वर्ल्ड कपसाठी ‘तीन का ड्रीम’, पाहा Video
आणखी वाचा – वर्ल्ड कपआधी पाकिस्तानची मोठी घोषणा; सेहवागशी पंगा घेणाऱ्याला अचानक बनवलं चीफ सेलेक्टर!
दरम्यान, तिलक वर्माने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही टी-ट्वेंटी सामन्यांमध्ये शानदार खेळी केली. दोन्ही सामन्यामध्ये तो टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्यामुळे आता त्याला वर्ल्ड कपमध्ये क्रमांक 4 ची जागा मिळणार की काय? असा सवाल विचारला जात आहे. ऋषभ पंत उपस्थित नसेल तर बीसीसीआय तिलक वर्माचा विचार करण्याची शक्यता आहे.