भारत 6-0 ने अजेय: बुमराह-शमीने 9 धावांच्या अंतराने 4 गडी टिपले, त्यामुळेच विजय

लखनऊ11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

‌विजयाचे 2 हीर : बुमराहची लय कायम, शमी घातक, किफायतीही

  • इंग्लंडचा १०० धावांनी पराभव

टीम इंडियाने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करत विश्वचषकात लागोपाठ सहाव्या विजयाची नोंद केली. आता भारताचा संघ उपांत्य फेरीत पोहोचणे जवळपास निश्चित झाले आहे. दुसरीकडे इंग्रजांचा संघ लागोपाठ पाच सामने हरल्यानंतर आता कोणत्याही परिस्थितीत टॉप-४ मध्ये पोहोचू शकणार नाही. भारताने इंग्लंडला २३० धावांचे लक्ष्य दिले होते. ही या वर्ल्डकपमधील भारताची आतापर्यंतची सर्वात कमी धावसंख्या होती. म्हणजे विजयाची संपूर्ण जबाबदारी आता गोलंदाजांच्या खांद्यांवर आली होती.

Related News

इंग्लंडच्या संघाने सुरुवातीला एकही गडी न गमावता ३० धावा केल्या होत्या. त्यानंतर शमी-बुमराह जोडीने कमाल केली. इंग्लंडचा संघ ३९ धावांपर्यंत पोहोचला असताना त्यांनी ४ गडी गमावले होते. इंग्लंडच्या सुरुवातीच्या चारही फलंदाजांना शमी-बुमराहने केवळ ९ धावांच्या फरकाने बाद केले. हा सामन्याचा टर्निंग पाॅइंट ठरला. यानंतर वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंड ३५व्या षटकापर्यंत १२९ धावांवर सर्वबाद झाला.

रोहित : कर्णधार म्हणून १०० वा सामना, यातही प्लेअर ऑफ द मॅच
रोहित शर्मा कर्णधार म्हणून आपला शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. ८७ धावांची खेळी करत तो ‘प्लेअर ऑफ द मॅच’ बनला. या खेळीत रोहितच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १८ हजार धावाही पूर्ण झाल्या.

आजचा सामना
अफगाणिस्तान श्रीलंका… दुपारी २ वाजता

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *