महातंत्र ऑनलाईन डेस्क : India vs Pakistan Asia Cup: आशिया चषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला शनिवारी (2 सप्टेंबर) श्रीलंकेत रंगणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात जेव्हा कधी सामना होतो तेव्हा चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता असते. दोन्ही संघांकडे स्टार खेळाडूंची फौज आहे, जे अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा नूर पालटू शकतात. अशातच विराट कोहली आणि रोहित शर्मा या स्टार जोडीने पाकिस्तानविरुद्ध फक्त 2 धावा करताच त्यांच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे.
5000 हून अधिक धावांची भागीदारी करणार?
विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीने पाकिस्तानविरुद्ध केवळ 2 धावा केल्या तर ते वनडे क्रिकेटमध्ये 5000 धावांची भागीदारी पूर्ण करतील. आतापर्यंत सौरव गांगुली-सचिन तेंडुलकर आणि शिखर धवन-रोहित शर्मा यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतासाठी 5000 हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. वनडे क्रिकेटमधील सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम सचिन-गांगुलीच्या नावावर आहे. या दोन महान फलंदाजांनी वनडेमध्ये भक्कम भागिदारी करताना 8227 धावांचे योगदान दिले आहे. (India vs Pakistan Asia Cup)
वनडेमध्ये भारतासाठी सर्वोच्च भागीदारी : (India vs Pakistan Asia Cup)
सौरव गांगुली आणि सचिन तेंडुलकर : 8227 धावा
शिखर धवन आणि रोहित शर्मा : 5206 धावा
रोहित शर्मा आणि विराट कोहली : 4998 धावा
5 वर्षांनी ब्लॉकब्लस्टर लढत
भारत आणि पाकिस्तान पाच वर्षानंतर वनडे सामन्यात भिडणार आहेत. अखेरच्यावेळी हे दोन संघ 2019 मध्ये खेळल्या गेलेल्या वनडे विश्वचषकात आमनेसामने आले होते. त्या लढतीत भारताने पाकिस्तानचा 89 धावांनी पराभव केला होता. तर त्याच्या एक वर्ष आधी, 2018 मध्ये टीम इंडियाने आशिया कप स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानला दोनदा धूळ चारली होती. भारत आणि पाक यांच्यात वनडे आशिया कपमध्ये आतापर्यंत 13 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी भारताने 7 आणि पाकिस्तानने 5 सामने जिंकले आहेत. 1 सामना ड्रॉ राहिला आहे. (India vs Pakistan Asia Cup)
रोहितने टॉस जिंकून ‘हा’ निर्णय घेतल्यास.. जाणून घ्या कशी असेल खेळपट्टी https://t.co/Un80zz98I5 #INDvsPAK #RohitSharma #AsiaCup23
— Pudhari News (@pudharionline) September 1, 2023