वर्ल्ड कपमध्ये आज भारताचा सामना गतविजेत्याशी: 20 वर्षांपासून टीम इंडियाला या स्पर्धेत इंग्लंडला हरवता आलेले नाही

  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • India Vs England World Cup Match Live Updates, World Cup 2023 Live Score, India Will Face The Defending Champions In The World Cup Today

लखनऊ2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज रविवारी 29 ऑक्टोबर रोजी भारताचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होणार आहे. लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर दुपारी 2 वाजता हा सामना होणार आहे. नाणेफेक अर्धा तास आधी म्हणजेच दुपारी 1.30 वाजता होईल.

Related News

टीम इंडिया 20 वर्षांपासून एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध विजयाची प्रतीक्षा करत आहे. या संघाने 2003 मध्ये शेवटचा विजय मिळवला होता. त्यानंतर दोघांमध्ये दोन सामने झाले. 2011 चा सामना बरोबरीत सुटला आणि 2019 मध्ये भारतीय संघाचा पराभव झाला.

या स्टोरीत, दोन्ही संघांचे हेड-टू-हेड रेकॉर्ड, विश्वचषक सामन्यांचे निकाल, खेळपट्टीचा अहवाल, हवामानाची परिस्थिती आणि संभाव्य अकरा खेळाडू जाणून घेऊया…

या विश्वचषकातील दोन्ही संघांचा सहावा सामना

स्पर्धा सुरू होण्यापूर्वी हा विश्वचषकातील सर्वात हाय प्रोफाईल सामना मानला जात होता. याला विजेतेपदासाठी सर्वाधिक प्रतिस्पर्धी असलेल्या दोन संघांमधील सामना म्हटले जात होते. पण, स्पर्धेतील अर्ध्याहून अधिक वेळ उलटून गेल्याने हा एक मिसमॅच दिसत आहे.

भारताने आतापर्यंतचे पहिले पाच सामने जिंकले आहेत आणि 10 गुणांसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. तर इंग्लंडने पाच पैकी फक्त एकच जिंकला आणि उरलेल्या चार सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लिश संघ दहाव्या आणि शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे भारत उपांत्य फेरी गाठणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्याचवेळी इंग्लंडला अंतिम चारमध्ये पोहोचणे जवळपास अशक्य दिसते.

हेड-टू-हेड आणि अलीकडील रेकॉर्ड
दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 106 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. भारताने 57 सामने जिंकले, तर इंग्लंडने 44 सामने जिंकले. तीन सामने अनिर्णित राहिले, तर दोन सामने बरोबरीत सुटले.

विश्वचषक स्पर्धेत दोन्ही संघ आतापर्यंत 8 वेळा आमनेसामने आले आहेत, 4 मध्ये इंग्लंड आणि 3 मध्ये भारत जिंकला आहे. 2011 मध्ये बंगळुरूच्या मैदानावर दोघांमधील एक अतिशय रोमांचक गट स्टेज सामना बरोबरीत सुटला होता. या सामन्यात सचिन तेंडुलकरने वनडे कारकिर्दीतील 48वे शतक झळकावले.

विश्वचषकाच्या इतिहासातील पहिला सामना या दोन संघांमध्ये झाला
7 जून 1975 रोजी या दोन संघांमध्ये एकदिवसीय विश्वचषकाचा पहिला सामनाही खेळला गेला होता, जो इंग्लंडने 202 धावांनी जिंकला होता. हा तोच सामना होता ज्यात सुनील गावस्करांनी संपूर्ण 60 षटके फलंदाजी केली आणि 174 चेंडूत नाबाद 36 धावा केल्या. तेव्हा असे सांगण्यात आले की भारतीय संघ आणि गावस्कर दोघेही वनडे फॉरमॅटमध्ये कंफर्ट नाहीत. 2019 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकात दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती. बर्मिंगहॅममध्ये झालेल्या या सामन्यात इंग्लंडने 31 धावांनी विजय मिळवला.

विराट भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू, आज कुलदीप चमत्कार करू शकतो
विराट कोहली हा एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये भारताचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे, त्याने स्पर्धेतील 6 सामन्यांमध्ये 354 धावा केल्या आहेत. त्याच्यानंतर फक्त रोहित शर्माच भारतासाठी 300 हून अधिक धावा करू शकला आहे. तर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने संघासाठी सर्वाधिक 11 विकेट घेतल्या आहेत, परंतु आज कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा लखनऊच्या खेळपट्टीवर गेम चेंजर्स ठरू शकतात. दोन्ही खेळाडूंना इकाना स्टेडियमची फिरकी खेळपट्टी आवडू शकते आणि ते इंग्लिश फलंदाजांना त्रास देऊ शकतात.

इंग्लंडचा कोणताही खेळाडू टॉप-5 परफॉर्मर्समध्ये नाही, मलानने एकमेव शतक झळकावले
यावेळचा विश्वचषक इंग्लंडसाठी दुःस्वप्नसारखा जात आहे, संघाने 5 पैकी 4 सामने गमावले आहेत आणि सध्या 2 गुणांसह गुणतालिकेत 10 व्या क्रमांकावर आहे. त्यांचा एकही खेळाडू या स्पर्धेतील टॉप-5 कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये नाही. संघाकडून एकमेव शतक हे सलामीवीर डेव्हिड मलानने बांगलादेशविरुद्ध केले होते, तो या स्पर्धेत संघाचा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. गोलंदाजांमध्ये आदिल रशीदच्या नावावर 6 विकेट आहेत, जे या स्पर्धेतील संघासाठी सर्वाधिक आहे.

टीमचे अपडेट
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आज इंग्लंडविरुद्ध खेळणार नाही. रिपोर्टनुसार त्याला लिगामेंटला दुखापत झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप हार्दिक किती सामन्यांत बाहेर पडेल याची पुष्टी केलेली नाही.

खेळपट्टीचा अहवाल
इकाना स्टेडियमच्या विकेटवर फिरकीपटूंना मदत मिळत आहे. आतापर्यंत येथे 7 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 3 सामने जिंकले असून प्रथम गोलंदाजी करणाऱ्या संघाने 4 सामने जिंकले आहेत. पहिल्या डावात सरासरी 215 धावा. संध्याकाळी येथे दवदेखील पडतो, ज्यामुळे संघाला नंतर गोलंदाजी करणे कठीण होऊ शकते.

हवामान अंदाज
लखनऊमध्ये 29 ऑक्टोबरला पावसाची 1% शक्यता आहे. या काळात वाऱ्याचा वेग ताशी 7 किलोमीटर राहील. तापमान 18 ते 31 अंश सेल्सिअसपर्यंत असू शकते.

दोन्ही संघांचे प्लेइंग 11
भारत: रोहित शर्मा (कर्णधार),
शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी/रविचंद्रन अश्विन आणि मोहम्मद सिराज.

इंग्लंड: जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, लियाम लिव्हिंगस्टन/हॅरी ब्रूक, मोईन अली, ख्रिस वोक्स/गस ऍटकिन्सन, डेव्हिड विली/सॅम करन, आदिल रशीद आणि मार्क वुड.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *