India World Cup 2023 Squad: वर्ल्डकपसाठी अशी असेल रोहितसेना; BCCI कडून 15 खेळाडूंच्या टीमची घोषणा

India Squad For World Cup 2023: बीसीसीआयने आगामी वनडे वर्ल्डकपसाठीच्या टीमची घोषणा केली आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी 15 जणांच्या स्क्वॉडची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला जात असल्याने टीम इंडिया जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार मानली जातेय. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला हा वर्ल्डकप खेळायचा आहे. 

वर्ल्डकपसाठी ‘या’ खेळाडूंना टीममध्ये संधी (Team India Squad For World Cup 2023)

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शुभमन गिल, केएल राहुल, हार्दिक पंड्या, श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मोहम्मद शमी, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर.

रोहित शर्माच्या हाती कर्णधारपदाची धुरा

टीम इंडिया प्रबळ दावेदार म्हणून वर्ल्डकपमध्ये उतरणार आहे. ओपनर रोहित शर्माकडे टीमचं कर्णधारपद सोपवण्यात आलं असून हार्दिक पांड्याला उपकर्णधार बनवण्यात आलंय. केएल राहुल आणि इशान किशन यांचा विकेटकीपर म्हणून टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. याशिवाय नुकतंच सर्जरी झालेल्या केएल राहुललाही संघात स्थान मिळालंय.

Related News

अश्विन आणि चहलला वगळलं (Player Who Missing World Cup 2023)

भारताचा अनुभवी स्पिनर युझवेंद्र चहलचं वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न भंगलं आहे. गेल्या वर्ल्डकपमध्येही चहलला टीममध्ये संधी देण्यात आली नव्हती. चहलसोबत आर अश्विनला देखील वर्ल्डकपच्या टीमचा भाग बनवण्यात आलेलं नाही. उत्तम स्पिनर म्हणून अश्विनचं नाव घेतलं जातं, मात्र वर्ल्डकपसाठी त्याच्या नावाचा विचार केलेला नाही. 

अजूनही टीममध्ये बदल करणं शक्य

दरम्यान टीम इंडिया अजूनही टीममध्ये बदल करू शकते. वर्ल्डकपसाठी ज्या देशांना टीम स्क्वॉडमध्ये बदल करायचा असेल तो देश 28 सप्टेंबरपर्यंत आयसीसीच्या परवानगीशिवाय बदल करू शकतात. मात्र 28 सप्टेंबरपर्यंत त्याला अंतिम 15 सदस्यीय टीम घोषित करावी लागणार आहे. यानंतर आयसीसीच्या मंजुरीनंतरच बदल करता येतील.

14 ऑक्टोबरला रंगणार भारत-पाकिस्तान सामना (India vs Pakistan Match Date)

भारत एकट्या देशाने वनडे वर्ल्डकप आयोजित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी 1987, 1996 आणि 2011 वर्ल्डकपचं संयुक्तपणे आयोजन केलं होतं. टीम इंडिया 8 ऑक्टोबर रोजी वर्ल्ड कप 2023 सिझनमधील पहिला सामना खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्ध हा सामना असून चेन्नईच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *