भारतीय पुरुषांच्या 4×400 मीटर रिले संघाने मोडला आशियाई विक्रम: प्रथमच जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरले

  • Marathi News
  • Sports
  • World Athletics Championships 2023 Updates Indian Men’s 4x400m Relay Team

बुडापेस्ट2 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

भारतीय पुरुषांच्या 4x400m रिले संघाने बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये 2:59.05 सेकंदांचा वेळ नोंदवून आशियाई विक्रम मोडला.

9 संघांमधील चुरशीतही भारतीय संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला आहे. पुरुषांच्या 4×400 मीटर रिलेचा अंतिम सामना आज म्हणजेच 27 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजता खेळवला जाईल.

या संघाने आशियाई तसेच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढले. 2020 ऑलिंपिकमध्ये, मोहम्मद अनस, नोहा निर्मल टॉम, अरोकिया राजीव आणि अमोज जेकब यांनी 3:00.25 चा राष्ट्रीय विक्रम केला होता.

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे 19 ते 27 ऑगस्टदरम्यान जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करण्यात आले आहे.

यापूर्वीचा आशियाई विक्रम 2:59.51 सेकंदांचा होता
पुरुषांच्या 4×400 मीटर रिलेमध्ये भारतीय संघाने आशियाई विक्रम तसेच राष्ट्रीय विक्रम मोडला. मागील वर्षी ओरेगॉनमध्ये जपानने 2:59.51 असा आशियाई विक्रम नोंदवला होता. त्याच वेळी मागील राष्ट्रीय विक्रम टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये बनविला गेला होता, जो 3:00.25 सेकंद होता.

अमेरिका पहिल्या क्रमांकावर
मुहम्मद अनस याहिया, अमोज जेकब, मुहम्मद अजमल वरियाथोडी आणि राजेश रमेश यांच्या भारतीय संघाने शनिवारी बुडापेस्ट, हंगेरी येथे नऊ संघांमध्ये दुसरे स्थान पटकावले. यूएसएने 2:58.47 सेकंद वेळेसह पहिले स्थान मिळवले.

तीन भारतीय भालाफेकच्या अंतिम फेरीत दाखल होणार
भारताचा ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा पुरुषांच्या भालाफेकच्या अंतिम फेरीत मनू डीपी आणि किशोर जेना यांच्यासोबत खेळताना दिसणार आहे. पात्रता फेरीच्या पहिल्याच प्रयत्नात नीरजने 88.77 मीटर फेक केले होते, जे त्याच्या मोसमातील सर्वोत्तमदेखील आहे.

चॅम्पियनशिपमध्ये भारताची केवळ दोनच पदके
जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 1983 मध्ये सुरू झाली. जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत केवळ दोनच पदके जिंकली आहेत. पॅरिस 2003 मध्ये अंजू बॉबी जॉर्ज महिलांच्या लांब उडीत जागतिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय ठरली. गेल्या वर्षी नीरज चोप्राने रौप्यपदक जिंकले होते. आतापर्यंत एकाही भारतीयाला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालेले नाही.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *