आशिया कपसाठी आज भारतीय संघ रवाना होणार: श्रेयस अय्यर फिट; लोकेश राहुलची श्रीलंकेमध्ये होणार टेस्ट

  • Marathi News
  • Sports
  • Cricket
  • Indian Team To Leave For Asia Cup Today Shreyas Iyer Fit; Lokesh Rahul’s Test Will Be Held In Sri Lanka

बंगळुरू9 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्या संयुक्त विद्यमाने आयाेजित आशिया कप क्रिकेट स्पर्धेला उद्या बुधवारपासून सुरुवात हाेत आहे. या स्पर्धेमध्ये भारताचा सामना २ सप्टेंबर राेजी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाविरुद्ध हाेणार आहे. याच प्रतिष्ठेच्या सामन्यासाठी टीम इंडियाने कसून सराव केला आहे. या स्पर्धेसाठी राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आज मंगळवारी रवाना हाेणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाचा श्रेयस अय्यर पूर्णपणे फिट झाला आहे. यामुळे ताे या सामन्यात चाैथ्या स्थानावर खेळण्यासाठी प्रबळ दावेदार ठरत आहे.

Related News

यामुळे भारताचे हे स्थान अधिक मजबूत मानले जात आहे. श्रेयस अय्यरने आता नुकतीच फिटनेस टेस्ट पास केली आहे. यामुळे त्याचा मैदानावर खेळण्याचा मार्ग माेकळा झाला आहे. दुसरीकडे लाेकेश राहुलही आता दुखापतीमधून सावरला आहे. मात्र, त्याला ऐनवेळी संधी देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे त्याच्यासाठी हा निर्णय वेट अॅँड वाॅच आहे. यातून त्याचा खेळण्याचा मार्ग माेकळा हाेणार आहे.

आशिया कपमध्ये सर्वाेत्तम कामगिरी करण्यावर माझा भर असेल. यामुळे मी आता नकारात्मकपणे हाेणाऱ्या टीकेकडे दुर्लक्ष करणार आहे,अशी प्रतिक्रिया कर्णधार राेहितने दिली.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *