सातारा3 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
भारतातील बहुप्रतिक्षित अशी जे बी जी सातारा हाफ हिल मॅरेथॉन स्पर्धा रविवार (दि.3,सप्टेंबर 2023) रोजी सातारा येथे आयोजित करण्यात आली असून यंदाचे या स्पर्धेचे बारावी वर्ष आहे. देशातील सर्वात खडतर अशी ही मॅरेथॉन मानली जाते. यंदाच्या मॅरेथॉनसाठी 7500 स्पर्धकांनी नोंद केली आहे. देशातील सर्वात महत्त्वाची अशी ही मॅरेथॉन मानली जाते. यंदाच्या मॅरेथॉन साठी थीम आहे “सर्वे धावकह कुटुंबकम”. म्हणजे सर्व रनर्स एकच कुटुंब आहेत.
2012 मध्ये डॉ संदीप काटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेली जेबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन भारतातील सर्वात मोठी समुदाय आयोजित मॅरेथॉन इव्हेंट आहे. या मॅरेथॉन ने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् मध्ये ‘ द मोस्ट पीपल इन सिंगल माऊंटन रन ‘ चा किताब प्राप्त करत आपली छाप निर्माण केली आहे. 5612 निश्चयी फिनिशर्स असलेली ही देशातील महिला रनर्स सर्वाधिक संख्या असलेली दुसरी सर्वात मोठी मॅरेथॉन आहे. देश विदेशातील अनेक मान्यवर धावपटू स्पर्धेत भाग घेताना पाहायला मिळतात. मॅरेथॉन स्पर्धा सातारा पोलीस ग्राउंड पासून सुरू होईल इव्हेंट सकाळी साडेसहा ते सकाळी साडेदहापर्यंत आयोजित करण्यात आले आहेत त्यांच्या फिनिश वेळा नुसार विविध पुरस्कारांसह सन्मानित करण्यात येते.
सातारा रनर्स फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर संदीप काटे या स्पर्धेच्या संदर्भात माहिती देताना म्हणाली की ही मॅरेथॉन शारीरिक चॅलेंजच्या तुलनेत एकता व आरोग्यदायी जीवनशैली बाबत जागरूकता निर्माण करते उज्वल भविष्यासाठी रनिंग करण्याच्या एकमेव उद्देशाने विविध समुदाय एकत्र येतात