Inzamam-ul-Haq resign : पाकचे निवड समिती अध्यक्ष इंझमाम-उल-हक यांचा राजीनामा? | महातंत्र
कराची, वृत्तसंस्था : भारतात सुरू असलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान संघाचा फ्लॉप शो सुरू आहे. त्यातच पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता इंझमाम-उल-हक (Inzamam-ul-Haq resign) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ते मागील काही कालावधीपासून मुख्य निवडकर्ता म्हणून पाकिस्तानी संघात खेळाडूंना संधी देत होते. घराणेशाही आणि जवळच्यांनाच संधी दिल्याचा आरोप झाल्याने त्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. लोक कोणत्याही आधाराशिवाय बोलतात. माझ्यावर प्रश्न उपस्थित केले गेले, त्यामुळे मी राजीनामा देणे चांगले आहे, असे मी ठरवले, असे इंझमाम यांनी ‘जिओ न्यूज’च्या वृत्तानुसार एका निवेदनात म्हटले आहे.

विद्यमान पाकिस्तानी संघात इंझमाम यांच्या जवळचे सहकारी असल्याने ते टीकाकारांच्या निशाण्यावर आले आहेत. पाकिस्तानला यंदाच्या वन-डे विश्वचषकात खास कामगिरी करता आली नाही. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाने सुरुवातीचे दोन सामने जिंकल्यानंतर सलग चार सामने गमावले आहेत. पाकिस्तानला अफगाणिस्ताविरुद्धदेखील पराभव स्वीकारावा लागल्याने जाणकारांसह पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी इंझमाम यांना लक्ष्य केले. लक्षणीय बाब म्हणजे, पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हक आणि शादाब खान हे इंझमाम यांचे नातेवाईक आहेत. इमाम त्यांचा भाचा आहे, तर शादाब जावई आहे. म्हणूनच मुख्य निवडकर्ता पदाचा गैरवापर करत इंझमाम त्यांना संधी देत असल्याचा आरोप होत आहे. (Inzamam-ul-Haq resign)

इमाम-उल-हकला साजेशी खेळी करण्यात यश आले असले, तरी त्याचा स्ट्राईक रेट संघाची डोकेदुखी वाढवणारा आहे. शादाब खान अष्टपैलू म्हणून संघात आहे; पण त्याला बॉल आणि चेंडू दोन्ही बाजूंनी अपयश आले. उपकर्णधार असूनही एका सामन्यात शादाबला वगळण्यातदेखील आले होते.

हेही वाचा…

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *