जालना37 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कोणत्याच कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार नसल्याचे दिसून येत आहे. जालना जिल्ह्यातील आंतरवली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जमुळे अजित पवार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात आणखी मोठा भुकंप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
जालन्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचे पडसाद राज्यात सर्वत्र उमटताना दिसत आहेत. राज्यातील राजकीय वर्तुळात देखील या घटनेमुळे आरोप प्रत्यारोपांना उधाण आले आहे. यादरम्यान जालन्यातील घटनेमुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे शासन आपल्या दारी या कार्यक्रमालाही अजित पवार यांनी उपस्थिती लावली नाही.
सलग तिसऱ्या दिवशी कार्यक्रम रद्द
उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यापासून त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. मात्र, जालना जिल्ह्यातील घटनेनंतर अजित पवारांनी पुणे, पिंपरी आणि बुलढाण्यातील तीन कार्यक्रम रद्द केले आहे. अजित पवार आजारी असल्याने हे कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे बोलेले जात आहे. तर दुसरीकडे अजित पवार नाराज असल्याचीही चर्चा आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी त्यांच्या कार्यक्रमाबाबत साशंकता कायम दिसून येत आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिली होती आजारी असल्याची माहिती
अजित पवार यांचे सगळे कार्यक्रम अधांतरी ठेवण्यात आल्याची माहिती आहे. गेल्या 2 दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात भाग घेतलेला दिसला नाही. त्यामुळे जालन्यातील घटनेनंतर महायुतीतील राष्ट्रवादी नाराज असल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, अजित पवारांची प्रकृती ठीक नसल्याची माहिती काल कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती. मात्र, ते खरेच आजारी आहेत की, नाराज आहेत, यावर चर्चा रंगली आहे.
उपसमितीची आज बैठक, अजित पवार जाणार का?
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या अध्यक्षतेखाली होत आहे. या बैठकीत मराठा आरक्षणाबाबत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला अजित पवार उपस्थित राहणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या संबंधी आणखी बातम्या वाचा…
मराठा आरक्षणावर मुख्यंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक:मनोज जरांगे यांना देखील निमंत्रण

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक सह्याद्री अतिथी गृहात होणार आहे. या बैठकीला राज्य सरकारच्या वतीने मनोज जरांगे यांना देखील विशेष निमंत्रण देण्यात आले आहे. पूर्ण बातमी वाचा…