Jacqueline Fernandez : जॅकलीनचे स्वप्नासाठी महाठग सुकेशचे पत्र व्हायरल | महातंत्र








महातंत्र ऑनलाईन डेस्क : महाठग सुकेश चंद्रशेखरने बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला पत्र लिहिलं आहे. सुकेश जॅकलीनचे स्वप्न पूर्ण करणार आहे. (Jacqueline Fernandez) त्याने आपल्या पत्रात दावा केला आहे की, तो बंगळुरुमध्ये जनावरांसाठी (कुत्री, मांजर आणि घोड्यांसाठी) एका इंटरनॅशनल लेवलचे सुपर-स्पेशालिटी हॉस्पिटल बनवत आहे. हे हॉस्पिटल २५ हजार स्क्वेअर फूटमध्ये असून बजेट २५ कोटी रुपये आहे. सुकेशने पत्रामध्ये म्हटलंय की, तो हे केवळ जॅकलीन फर्नांडिससाठी करणार आहे. (Jacqueline Fernandez)

पत्रात त्याने म्हटलंय की, ”हे हॉस्पिटल प्राण्यांबद्दलचे तुमचे प्रेम…. माझी बेबी डॉल.” तुझ्या कल्पनेप्रमाणे, संपूर्ण आशियातील अशा प्रकारचे हे एकमेव रुग्णालय असेल. माझ्या टीमने सर्व काही गोळा केले असून ते बनवण्याचे काम सुरू झाले आहे. त्यात सुकेशने असेही सांगितले की, हे रुग्णालय ११ सप्टेंबर २०२४ पासून सुरु होईल, म्हणजेच त्यावेळी जॅकलिन फर्नांडिसचा वाढदिवस आहे.

सुकेशने हेदेखील म्हटले आहे की, तिने साऊथ आणि संयुक्त अरब अमीरातमध्ये एक टॉप इन्फ्रास्ट्रक्चर फर्मला कन्स्ट्रक्शनचे कॉन्ट्रॅक्ट दिले आहे. या कामात जरादेखील उशीर होऊन नये म्हणून कॉन्ट्रॅक्ट साईन केलं होतं आणि पैसेदेखील ॲडव्हान्समध्ये पूर्ण दिले गेले आहेत. सर्व उपकरणे जर्मनीहून मागवण्यात आले आहेत. या हॉस्पिटलची थीम पांडरी आणि गुलाबी असेल.

 









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *