जळगाव हादरलं! चिमुकलीवर अत्याचार करत तरुणाने केली हत्या; गोठ्यात लपवला होता मृतदेह

वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव : गावातीलच 19 वर्षीय तरुणाने चिमुकलीवर अत्याचार (physical abuse) करत हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावमध्ये (Jalgaon Crime) समोर आला आहे. आरोपी तरुणाने चिमुकलीची हत्या करून गुरांच्या गोठ्यात कुटाराच्या ढिगाऱ्यात चिमुकलीचा मृतदेह लपवला होता. पोलिसांनी (Jalgaon Police) घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली आणि तपासानंतर आरोपीला अटक केली आहे. मात्र या घटनेमुळे गावात संतापाचं वातावरण आहे. संतापलेल्या गावकऱ्यांनी पोलिसांवरच दगडफेक (stone painting) केल्यानं वाद चिघळला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांकडून गावकऱ्यांवर सौम्य लाठीमार करण्यात आला आहे. दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. तर पोलीस वाहनांचे ही नुकसान मोठं नुकसान झालं आहे.

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात एका गावात बेपत्ता असलेल्या आठ वर्षीय चिमुकलीचा गावातीलच गुरांच्या गोठ्यात मृतदेह आढळून आला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला होता. शवविच्छेदनाच्या अहवालात तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपासणी केली असता गावातीलच एका 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने ठेचत तिची हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने स्वप्निल विनोद पाटील या 19 वर्षीय तरुणास अटक केली आहे. दरम्यान आरोपी तरुणास आपल्या ताब्यात देण्याची मागणी करत ग्रामस्थांनी पोलिसांसोबत वाद घातला. मात्र पोलिसांनी त्यांना रोखल्याने गावात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच दगडफेक झाल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर सौम्य लाठी चार्ज केला. या घटनेत काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली असून दगडफेकीत पोलीस वाहनांचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

Related News

दरम्यान, चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी बंदोबस्तात आणल्यानंतर हा सगळा प्रकार घडला होता. संशयितास आमच्या हवाली करा म्हणून ग्रामस्थांनी गोंधळ घातला. त्यानंतर झालेल्या दगडफेकीत तीन पोलीस जखमी झाले आहेत.

पोलिसांनी काय सांगितले?

“30 जुलै रोजी पीडित मुलगी परत आली नाही म्हणून कुटुंबियांनी तक्रार नोंदवली होती. त्यानंतर दोन दिवसांनी शेजाऱ्याच्या गोठ्यात मुलीचा मृतदेह सापडला. त्यानंतर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा त्याच गावातील रहिवासाही आहे. आरोपीचे नाव स्वप्नील उर्फ सोन्या विनोद पाटील असं आहे. आरोपी स्वप्निल हा पीडित परिवाच्या ओळखीचा आहे. आरोपीने गोठ्यातच मुलीवर अत्याचार केला आणि तिथेच तिची हत्या केली. हत्येनंतर चाऱ्याखाली तिचा मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला,” अशी माहिती जळगावचे पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी दिली.Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *