जळगाव : वाढीव कर पत्रकाची होळी करून पालिका प्रशासनाचा निषेध | महातंत्र
जळगाव; महातंत्र वृत्तसेवा : भुसावळ शहरांमध्ये गेल्या सहा महिन्यापासून नवीन कर पद्धतीनुसार काम सुरू आहे गेल्या आठवड्यात घरधारकांना दिले गेलेले कर पत्रक हे अव्वाच्या सव्वा असल्याचे दिसून आले नियमानुसार ही दर आकारणी झालेली नाही ज्या कंपनीने हा अहवाल दिला व काम केले ती कंपनी बोगस असल्याची भावना युवराज लोणारी यांनी बोलून दाखविली तर मंदिर मशिदी राष्ट्रीय स्मारक व राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांना देखील कर आकारणी करणाऱ्या पालिका प्रशासनाचा भाजपने तीव्र शब्दात निषेध केला.

हा सर्व प्रकार तात्काळ न थांबल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे दरम्यान कर पत्रक वाटप थांबवावे व जर का कर पत्रक वाटप करणारे पुन्हा शहरात दिसले तर त्यांना झोप दिला जाईल असेही यावेळी सांगण्यात आले दरम्यान आमदार सावकार यांनी यासंदर्भात प्रशासन अधिकारी जितेंद्र पाटील मुख्याधिकारी राहुल वाघमोडे यांच्यासह अन्य अधिकारी यांच्याशी चर्चा करून येत्या दीड महिन्यात योग्य ती कर आकारणी करून ती नागरिकांना द्यावी व कुठल्याही प्रकारचा बेकायदेशीर कर आकारणी करू नये अशी तंबी दिली यावेळी मुख्याधिकारी यांनी ज्या ज्या चुका झाल्या असतील त्या त्या सर्व निष्करणासाठी पंधरा दिवसांचा कालावधी द्यावा व ज्यांना या करावर आक्षेप आहे अशांनी एक महिना अतिरिक्त मुदतवाढ देण्यात येत असल्याचे यावेळी सांगितले दरम्यान प्राध्यापक दिनेश राठी यांनी नियमानुसार 40% च्या वर कर आकारणी करता येत नाही. मात्र भुसावळ पालिकेने ४०० टक्क्यांच्या वर करवाढ केल्याचा अजब कारभार या ठिकाणी सुरू असून झाल्या प्रकाराचा निषेध केला आहे. यावेळी आ.संजय सावकारे, भाजपा शहराध्यक्ष परीक्षित बऱ्हाटे, युवराज लोणारी राजेंद्र आवटे, प्रमोद नेमाडे व भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

संतप्त कार्यकर्त्यांनी कर पत्रकाची केली होळी

भुसावळ पालिकेत सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची दखल आज खुर्द आमदार संजय सावकार यांनी घेतली असता वाढून आलेले कर पत्रक जमा करीत नगरपालिका आवारात याकरपत्राची होळी करून करा कारणे करणारी कंपनी व नगरपालिका प्रशासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *