Janhvi Kapoor : जान्हवीने तिरुमालातील श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात जाऊन घेतले दर्शन (Video) | महातंत्र








महातंत्र ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री जान्हवी कपूरने देवरा शूटिंग दरम्यान तिरुमाला मंदिरात जाऊन दर्शन घेतले. जान्हवी कपूर (Janhvi Kapoor ) सोमवारी सकाळी श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात दर्शन करण्यासाठी पोहोचली. यादरम्यान अभिनेत्री जान्हवी नो मेकअप लुकमध्ये दिसली. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या ज्युनिअर एनटीआर आणि सैफ अली खानसोबत आगामी चित्रपट ‘देवरा’चे शूटिंगसाठी हैदराबादमध्ये आहे. शूटिंगवेळी तिने आपल्या खूप बिझी शेड्यूलमधून वेळ काढून सोमवारी सकाळी तिरुमाला मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेली. (Janhvi Kapoor )

भक्तीमध्ये तल्लीन जान्हवी कपूर

सोमवारी सकाळी जान्हवी कपूर ट्रॅडिशनल लव्हेंडर साडीमध्ये दिसली. तिरुमालामध्ये श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिरात माथा टेकण्यासाठी पोहोचली होती. यादरम्यान ती विना मेकअप लूकमध्ये दिसली आणि भगवान वेंकटेश्वर स्वामीच्या भक्तीमध्ये तल्लीन दिसली. जान्हीवी कपूर मंदिरात आपले सिक्युरिटी गार्ड्स आणि आपल्या टीमच्या सदस्यांसोबत मंदिराच्या मॅनेजमेंट कमिटीसोबत दिसली. तिचा हा व्हिडियो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आंध्र प्रदेशातील तिरुमालामध्ये श्री वेंकटेश्वर स्वामी मंदिर भारतातील सर्वात प्रतिष्ठित मंदिरांपैकी एक आहे. केवळ जान्हवीचं नाही तर तिची आई श्रीदेवीचीदेखील या मंदिराशी आस्था जोडलेली आहे. जान्हवी कपूर मंदिरात येताच तिची एक झलक पाहण्यासाठी तिथे गर्दी जमली. तिने कुणासोबतही बोलण्यास टाळले. मंदिरात माथा टेकल्यानंतर ती लवकर बाहेर पडताना दिसली.

जान्हवी शेवटी नितेश तिवारी दिग्दर्शित चित्रपट ‘बवाल’मध्ये दिसली होती. या चित्रपटाचील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. मार्चमध्य़े तिने तिच्या वाढदिवसाला ‘देवरा’ मधून तेलुगु डेब्यू करण्याची घोषणा केली होती.











Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *