जळगाव; महातंत्र वृत्तसेवा : संकटमोचन नावालाच आहे पुढे पुढे करणारे आहे संकट मोचक फेल झाले म्हणूनच जरांगे पाटलांचे उपोषण सुरू आहे आमच्या जिल्ह्यातील कोळी बांधवांचा त्यांनी प्रश्न सोडवावा आणि त्यांचा संकट मोचक म्हणून सत्कार करू एकनाथराव खडसे प्रकाराशी बोलतांना म्हणाले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे सायंकाळी कोळी समाजाच्या उपोषण स्थळी जाऊन त्यांची भेट घेतली यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, जिल्ह्यातील मंत्री अनेक वर्षांपासून मंत्रीमंडळात आहेत ते उभ्या महाराष्ट्राचे नेते म्हणून घेतात त्यांची पत असेल तर त्यांनी हा प्रश्न नियमाप्रमाणे व कायद्याप्रमाणे सोडवा आता तुम्ही जो जीआर वाचला त्याप्रमाणे त्यांना जात प्रमाणपत्र मिळावं यामधील मार्ग त्यांनी काढला पाहिजे. एक वेळा भेट दिली आणि चालले गेले ही जबाबदारी झटकण्याचा प्रकार आहे असा टोला त्यांनी गिरीश महाजन यांना मारला. कोळी बांधवांचे गेल्या 22 दिवसांपासून आमरण उपोषण व साखळी उपोषण सुरू आहे कोळी समाजाला नियमानुसार जात प्रमाणपत्र मिळाले पाहिजे यासाठी ते उपोषण करीत आहेत. शासनाच्या परिपत्रकात स्पष्ट उल्लेख केला आहे की कोळी हा शब्द आहे सरकारच्या जीआरमध्ये कोळी हे आदिवासींमध्ये आहेत त्यानुसार त्यांना जात प्रमाणपत्र मिळाले पाहिजे दुसऱ्याचे आरक्षण मधून आरक्षण मिळावे किंवा ते आरक्षण वाढवून मिळावे अशी कोणतीही मागणी आदिवासी कोळी समाज करत नाही आहे जीआर नुसार त्यांना कोळी समाजाचे जात प्रमाणपत्र मिळावे यासाठी जिल्ह्यात आर डी सी ने पत्रही पाठवलेले आहे त्यांचे आदिवासींचे आरक्षण काढून घेण्याचा उद्देश नाही आदिवासींच्या सवलती मिळाव्यात व त्यांना योग्य तो न्याय मिळावा यासाठी ते गेल्या 22 दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहे .
राज्यात संकटमोचक म्हणून ओळखले जाणाऱ्यांनी नियमाप्रमाणे व कायद्याप्रमाणे यांना आरक्षण मिळवून द्यावा व यांचा प्रश्न सोडवा त्यांच्या सत्कार करू असे माध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे म्हणाले.