सरकारला लेखी टाइम बाँड नाही‎तर थेट जाब विचारणार-जरांगे‎: 24 डिसेंबरनंतर आंदोलन अधिक तीव्र करणार‎

पुणे‎5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मराठा आरक्षणासाठी सरकारला आता‎लेखी टाइम बाँड नाही तर थेट जाब‎विचारणार आहे. मराठा समाजाला‎आरक्षण मिळण्यासाठी आता समाजातील‎‎प्रत्येक आमदाराने‎‎पाठीशी उभे राहावे. जर‎‎२४ डिसेंबर पर्यंत मराठा‎‎समाजाला आरक्षण‎‎मिळाले नाही तर‎‎आंदोलन तीव्र करणार‎तोपर्यंत धीर धरा, असे आवाहन मनोज‎जरांगे पाटील यांनी केले. पुण्यातील खराडी‎येथे जरांगे पाटील यांची जाहीर सभा झाली.‎ जरांगे म्हणाले, सरकारचे शिष्टमंडळ‎फक्त तारीख पे तारीख देत आहेत. त्यामुळे‎आता सरका मधील काही मंत्र्यांना थेट फोन‎करून याबाबत जाब विचारणार आहे.‎ राज्यात आतापर्यंत २९ लाख नोंदी‎सापडल्या आहेत. १८०५ पासून १९६७ पर्यंत‎आणि सगळे पुरावे शोधण्याचे काम सुरू‎असून ओबीसी प्रवर्गात मराठे असल्याचे‎देखील समोर आले आहे. ७० वर्षांपासून‎मराठ्यांचे कुणी वाटोळं केले याचे उत्तर‎आता द्यायला हवे, असे देखील जरांगे‎पाटील म्हणाले. मराठा आरक्षणाची लढाई‎खूप वर्षांपासून सुरू आहे. अनेकांनी‎टोकाची झुंज दिली आहे. मराठ्यांना‎आरक्षण मिळेपर्यंत सरकारला आता‎बिलकुल सुटी नाही, आमच्या हक्काचे‎आरक्षण आम्हाला पाहिजे. आहे. एक‎डिसेंबरपासून राज्यात गावागावात शांततेत‎आंदोलन करावे. साखळी उपोषण करून‎शांततेत आंदोलन उभारण्याचे आवाहन‎जरांगे पाटील यांनी उपस्थित‎जनसमुदायाला केले.‎

Related News

ज्यांना मोठे केले तेच आरक्षणाच्या मुळावर उठलेत‎ मराठा समाज

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *