मध्य प्रदेशमधून पिस्टल विक्रीसाठी पुण्यात आलेला तरुण जेरबंद: भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून केली अटक

पुणेएका तासापूर्वी

  • कॉपी लिंक

मुळचा मध्यप्रदेश मधील रहिवासी असलेला व कामाच्या निमित्ताने पुण्यात ये-जा करणाऱ्या एका तरुणास पिस्टल विक्रीसाठी पुण्यात आला असताना भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. सतिश गुलाबराव शेरके (वय-23) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव असून ताे मुळचा मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्हयातील सारंग बिहारी गावचा रहिवासी आहे.

Related News

गणेशाेत्सवाचे अनुषंगाने भारती विद्यापीठ पोलिस स्टेशनचे पोलिस गस्त घालत असताना, पोलिस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमाेडे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती कात्रज घाटातील भिलारेवाडी येथे पेट्राेल पंपाच्या समाेरील बाजूस पिस्टल कमरेला लावून थांबलेला आहे. त्यानुसार, पोलिसांचे पथकाने भिलारेवाडी येथील पेट्राेल पंपाच्या पुढील बाजूचे शंुभ शंकर मिसळ हाऊस हाॅटेल समाेरील कात्रज घाटाचे चढाचे रस्त्यावर संशयित व्यक्ती मिळून आला. सतिश शेरके याची पोलिसांची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे40 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे एक पिस्टल व 600 रुपये किंमतीचे तीन काडतुसे मिळून आलेली आहे.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात याप्रकरणी आराेपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वपाेनि विनायक गायकवाड, पाेनि (गुन्हे) विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक अमाेल रसाळ, पोलिस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलिस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमाेडे, सचिन सरपाले, चेतन गाेरे, महेश बारावकर, शैलेश साठे, निलेश ढमढरे, राहूल तांबे, अभिजीत जाधव, अवधूत जमदाडे, धनाजी धाेत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, अशिष गायकवाड, अभिनय चाैधरी, विक्रम सावंत यांचे पथकाने केली आहे.

Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *