Jos Buttler: अंतर्मन मला सांगत होतं की…; वर्ल्डकपमध्ये पाचव्या पराभवानंतर काय म्हणाला जॉस बटलर?

Jos Buttler: गतविजेत्या इंग्लंडच्या टीमची खराब कामगिरी टीम इंडियाविरूद्धही ( Team India ) दिसून आली. भारताविरूद्ध इंग्लंडच्या टीमचा तब्बल 100 रन्सने दारूण पराभव झाला. 6 सामन्यांमध्ये इंग्लंडच्या ( England ) टीमला केवळ 1 विजय मिळवता आलाय. 5 पराभवांमुळे या स्पर्धेत टिकून राहणं आता इंग्लंडच्या टीमसाठी आता जवळपास अशक्य झालंय. यावेळी सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलरने ( Jos Buttler ) फलंदाजांनी चांगली कामगिरी केली नसल्याचं म्हटलंय.

पराभवानंतर काय म्हणाला Jos Buttler?

इंग्लंडचा हा पाचवा पराभव होता. भारताविरूद्ध झालेल्या पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार जॉस बटलर ( Jos Buttler ) म्हणाला की, हा पराभव खूप निराशाजनक आहे. 230 रन्सचा पाठलाग करताना आमच्या लक्षात आलं की, मैदानावर दव पडलं. मला खात्री नव्हतं की, मैदानावर दवं येईल किंवा नाही. काही उत्तम खेळाडू त्यांच्या सर्वोत्कृष्ट खेळासाठी कमी पडताना दिसतायत. 

बटलर ( Jos Buttler ) पुढे म्हणाला की, माझं अंतर्मन मला सांगत होतं की, लक्ष्याचा पाठलाग केला पाहिजे. पॉवरप्लेमध्ये चांगली सुरुवात झाली होती. खेळपट्टीवर थोडा बाउन्स होत होता, मैदानी फिल्डींग चांगली होती. मात्र या सामन्यात आम्ही फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली नाही.

Related News

इंग्लंडचा 100 रन्सने पराभव

लखनऊच्या एकना स्टेडियमवर रविवारी झालेल्या वर्ल्डकप 2023 सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 रन्सने पराभव केला. 2023 च्या वर्ल्डकप स्पर्धेत रोहित शर्माच्या सेनेने सलग 6 सामने जिंकून विजयाचा ‘षटकार’ लगावलाय. टीम इंडियाने 20 वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा पराभव केला आहे. या सामन्यात टॉस गमावून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 ओव्हर्समध्ये 9 गडी गमावून 229 रन्स केले. 230 रन्सच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडची टीम 34.5 ओव्हर्समध्ये 129 रन्समध्ये गडगडली.

कर्णधाराची निराशाजनक कामगिरी

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात जॉस बटलरने ( Jos Buttler ) 43 रन्स केले होते. यानंतर त्याने बांगलादेशविरुद्ध 20 रन्सचं योगदान दिलं. त्याने अफगाणिस्तानविरुद्ध 9 रन्स, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 15 रन्स, श्रीलंकेविरुद्ध 8 आणि भारताविरुद्ध 8 रन्स केले. एकंदरीत या स्पर्धेमध्ये इंग्लंडच्या कर्णधाराची निराशाजनक कामगिरी पहायला मिळालीये. 



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *