Kapil Dev On Bumrah: बुमराहवर वेळ खर्च करणं म्हणजे बर्बादी, असं का म्हणाले कपिल देव?

Kapil Dev Talk On Jasprit Bumrah fitness: टीम इंडियाचे माजी कर्णधार कपिल देव (Kapil Dev) नेहमी आपल्या स्पष्टोक्तेपणामुळे ओळखले जातात. टीम इंडियाच्या धोरणांवर त्यांनी नेहमी आपलं मत मांडलं आहे. काही दिवसांपूर्वी कपिल देव यांनी पांड्याच्या कसोटी खेळण्यावरून खडेबोल सुनावले होते. अशातच आता कपिल देव यांनी बुमराहच्या फिटनेसवरून (Jasprit Bumrah fitness) बीसीसीआयला सुनावलं आहे. त्यावरून आता वाद देखील निर्माण होत्याची शक्यता आहे.

जसप्रीत बुमराहवर काय म्हणतात?

कपिल देव यांनी जसप्रीत बुमराह आणि आयपीएलवर खेळणाऱ्या खेळाडूंवर निशाणा साधलाय. गेल्या वर्षभरापासून बुमराह क्रिकेटपासून लांब आहे. आता वर्ल्ड कप तोंडावर (World Cup) आलाय तरी देखील तो मैदानात उतरला नाही. त्यामुळे ही चिंतेची बाब असल्याचं कपिल देव (Kapil Dev) म्हणतात. तो योग्य वेळेत जर फिट होणार नसेल तर त्यावर फोकस करणं म्हणजे वेळ बर्बाद करण्यासारखं आहे, असं स्पष्ट मत कपिल देव यांनी मांडलंय. तो सेमीफायनल किंवा फायनल सामन्यामध्ये खेळणार नसेल तर त्यावर वेळ घालवण्यात काय अर्थ आहे? असंही देव म्हणतात.

सराव करताना किंवा सामना खेळताना प्रत्येकाने आपली काळजीस घेतली पाहिजे. आयपीएल चांगली स्पर्धा आहे मात्र आयपीएलमुळे तुमचं संपूर्ण करिअरही संपू शकतं, असं म्हणत त्यांनी युवा खेळाडूंना सल्ले दिले आहेत. किरकोळ दुखापतीला हलक्यात घेऊ नका. ती दुखापत नंतर त्रास देऊ शकते, असा सल्ला देखील कपिल देव यांनी युवा खेळाडूंना दिलाय. त्यावेळी त्यांनी बीसीसीआयला देखील सुनावलं. खेळाडूंना किती प्रमाणात खेळवलं पाहिजे, याचा विचार बोर्डाने केला पाहिजे. तुमच्याकडे पैसा आहे पण योग्य कॅलेंडर असण्याची गरज आहे, असं म्हणत कपिल देव यांनी भारतीय क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे.

Related News

बुमराहने सप्टेंबर 2022 नंतर एकही सामना खेळलेला नाही. सततच्या दुखापतीमुळे बुमराह संघाबाहेर होता, त्यानंतर त्याला सर्जरीला (Jasprit Bumrah Comeback) सामोरं जावं लागलं. बेंगळुरू येथील एनसीएमध्ये (NCA) बुमराह गोलंदाजी करताना दिसतोय. त्यामुळे आता तो वर्ल्ड कपमध्ये किंवा आगामी आशिया कपमध्ये कमबॅक करेल, अशी शक्यता आहे.

आणखी वाचा – MLC 2023 Final: 40 बॉलमध्ये सेंच्युरी ठोकणाऱ्या Nicholas Pooran सोबत धोका? MI ला जिंकूनही हरला निकोलस! 

दरम्यान, भारतीय खेळाडूंमध्ये आत्मविश्वास ठासून भरलाय. आपल्याला सगळं कळतं अशी समजूत असणं ही नकारात्मक बाब आहे. एक अनुभवी व्यक्ती नेहमी तुम्हाला मदत करू शकतो. मात्र, पैसे आल्यावर अहंकार देखील येतो, असं कपिल देव म्हणाले होते.



Information Source / Image Credits

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *