Ketaki Chitale : ‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?’ केतकी ट्रोल | महातंत्र

महातंत्र ऑनलाईन डेस्क : एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? असा प्रश्न उपस्थित करत बिनधास्त मराठी अभिनेत्री केतकी चितळेने पोस्ट शेअर केलीय. तिने फेसबूक पोस्ट लिहून आरक्षणाविषयी काय म्हटले आहे, पाहा. (Ketaki Chitale ) एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा?? इंडियाला Uniform Civil Code (UCC) असेल, पण भारताला #UniformCivilLaw ची गरज आहे. सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एसटी विभाग किंवा चालक कसे देणार आरक्षण. चुकून तो दगड चालकाला लागला असता तर? जय हिंद, वंदे मातरम, भारता माता की जय. (Ketaki Chitale )

संबंधित बातम्या –

या तिच्या पोस्टनंतर यावर कॉमेंट्सचा पाऊस पडलाय. काही नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केलीय. तिला सोशल मीडियावरून तुफान ट्रोल केलं जात आहे. तर काहींनी तिची बाजू घेत म्हटले आहे की- माझ्या मते आरक्षणाची गरज काय आहे, जर तुमच्यात क्षणता आहे तर स्व हिमतीवर करा.

काय म्हणाले नेटकरी?

लाईव्ह येऊन डेब्यू करता का ताई मग सांगतो, इतका अभ्यास असेल तर या चर्चा करू, ५५ मोर्चे शांततेत काढले होते, त्यावेळी सरकार आणि तुम्ही झोपले होते का, तुला काय त्रास आहे केतकी आरक्षणाचा?, सध्या वातावरण खराब आहे , अशा पोस्ट करू नका प्लीज. सदावर्तेंसोबत मीटिंग झाली का केतकी लवकर परिणाम दिसत आहे. एकदा मराठ्यांसोबत मिटींग कर म्हणजे समजेल.

तर काही नेटकऱ्यांनी म्हटलंय की – दगड मारणारा शुद्धीत तरी आहे काय? कमाल म्हणजे आज राष्ट्रीय एकता दिन आहे आणि लोकांचे धमकावणे काही संपत नाही. तू कधी एसटीने प्रवास केलंय का आधी सांग? हिंसा मार्ग असू शकत नाही.

दरम्यान, काल राज्यात ठिकठिकाणी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे लोण पसरले होते. काही ठिकाणी जाळपोळ तर काही ठिकाणी साखळी उपोषण सुरु आहे. तर काही ठिकाणी एसटी बसच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. यावेळी काही ठिकाणी कँडल मार्च देखील काढण्यात आले.

Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *