एअर इंडियाच्या विमानांवर खलिस्तानवाद्यांचा बहिष्कार | महातंत्र








मोहाली; वृत्तसंस्था : भारत सरकारच्या हिटलिस्टमध्ये समावेश असलेला खलिस्तानवादी शीख फॉर जस्टिस (एसएफजे) दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नूने आता मोहालीच्या चंदीगड विमानतळाबाहेर खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या आहेत. पन्नूने त्याचा आणखी एक व्हिडीओ जारी करत रविवारपासून एअर इंडियाच्या विमानांवर बहिष्कार टाकण्याची घोषणाही केली.

एसएफजेला अमृतसर-अहमदाबाद-दिल्ली विमानतळावर प्रवेश आहे, अशी धमकी पन्नूने दिली. व्हिडीओत पन्नू म्हणतो की, शीख राष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी रविवारपासून एअर इंडियाच्या विमानातून प्रवास करू नका. कारण त्यामुळे भावी शीख पिढ्या धोक्यात येतील. काही दिवसांपूर्वी पन्नूने एक व्हिडीओ जारी करत रविवारपासून एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये प्रवास न करण्याचे सांगितले होते, अन्यथा तुमच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. पन्नूने दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्याची धमकी दिली होती. 19 नोव्हेंबर हा तोच दिवस आहे ज्या दिवशी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे, असे तो म्हणाला होता.

भारताकडून शीखांवर अत्याचार

व्हिडीओमध्ये पन्नू म्हणतो की, भारताने शीखांवर अत्याचार केले आहेत. पंजाबला भारतापासून वेगळे केल्यानंतर आम्ही दिल्ली विमानतळाचे नाव बदलून बिआंत सिंग, सतवंत सिंग यांच्या नावावर ठेवतील. बिआंत सिंग आणि सतवंत सिंग हे माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे अंगरक्षक होते. त्यांनी 31 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांच्यावर गोळीबार करून हत्या केली होती.









Information Source / Image Credits

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *